माजी जि.प.सभापती अशोक काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम..
दिनांक 13 ऑक्टोंबर रोजी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात अपेंडिक्स,हर्निया, स्तनांच्या गाठी शरीरातील मासांच्या गाठी तसेच जीभ चीटकणे,हातावरील गाठी,पाठीच्या मणक्यातील गाठी अशा प्रकारच्या शस्त्रक्रियाच्या आदी 29 रुग्णावर रविवारी 13 ऑक्टोंबर रोजी सेलू येथे आयोजित शिबिरात यशस्वी मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या यावेळेस परभणी जिल्हा परिषद चे माजी सभापती बळीराजा संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा जनसेवा मदत केंद्राचे मार्गदर्शक अशोक काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शस्त्रक्रिया शिबिराच्या आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.
अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जनार्दन
गोळेगावकर होते. याप्रसंगी अशोक काकडे, डॉ.अरुण रोडगे, डॉ आलेश बुरेवार, मदतकेंद्राचे अध्यक्ष सचिन धापसे, शाफिक अली, दत्तूसिंग ठाकूर, बापूसाहेब मोगल, नियाजभाई, गौसलाला, संतोष ठाकूर, सचिन शिंदे, तौफिक सिद्दिकी, रफिक भाई, बाबा भदर्गे, निर्मलताई लिपणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. शस्त्रक्रियेसाठी
शल्यचिकित्सक डॉ.अर्जुन पवार, डॉ.श्रीराम
वानखेडे, डॉ.राजेश आकुलवार, डॉ.आलेश
बुरेवार, डॉ. संतोष चव्हाण, डॉ आरती गवई,
भूलतज्ञ डॉ.अरुण रोडगे यांनी सहभाग घेतला. विकास चव्हाण, भाग्यश्री त्रिभुवन, इंद्रजित मगर, रविता चव्हाण आदींनी त्यांना सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभार परवेज सौदागर यांनी मानले. शिबिरासाठी जनसेवा मदत सेवा केंद्र, कर्मचारी तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.