अयज दळवे यांच्या गोदामात तील संशयास्पद जप्त केलेले धान्य परत,

सेलू,दिनांक 12.09.2024 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, परभणी पो.स्टे. सेलू यांच्या संयुक्त कार्यवाहीत फुले नगर पाथरी रोड, सेलू येथील इसम नामे अजय शिवाजीराव दळवे यांचे शेतात राशनचे शासकीय धान्य असल्याचे संशयावरून गुरन 455/2024 जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 चे कलम 3,7 अन्वये गुन्हा दाखल करून खालील वर्णनाचा जप्त मुद्देमाल शासकीय धान्य गोदाम सेलू येथे साठवणूक केला आहे. विविध रंगाच्या नायलॉनच्या एकुण 96 पोत्यामध्ये एकुण 5674 कि.ग्रॅ. तांदुळ ज्याची किंमत प्रति किलो 25/- रूपये प्रमाणे एकुण किंमत 141850/-, विविध रंगाच्या नायलॉनच्या एकुण 43 पोत्यामध्ये एकुण 2421 कि.ग्रॅ. गहु ज्याची किंमत प्रती किलो 25/- रूपये प्रमाणे एकुण किंमत 60525/-, एक TOSHIBA कंपणीचा ईलेक्ट्रॉनीक लोखंडी काटा रूपये असा एकुण 2,12,375/- रुपयाचा जप्त मुद्देमाल शासकीय धान्य गोदाम सेलू येथे जमा करण्यात आलेला आहे. परंतु शासकीय धान्य गोदाम येथे प्रत्यक्षात धान्याचे वजन केले असता 96 पोत्यातील तांदुळाचे वजन 23.85 क्वि. तर 43 पोत्यामधील गव्हाचे वजन 55.19 क्वि. भरल्याचे गोदामपाल यांनी
कळविले आहे. तसेच श्री. रूषीकेश पौळ, पुरवठा निरिक्षक, तहसील कार्यालय सेलू यांनी स्थळ पंचनामा करून सदरचा गहु व तांदुळाचे सिलबंद नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तसेच प्रकरणात अजय शिवाजीराव दळवे व जावेद शहर महेकाईल शाहा रा. सेलू यांनी सदरील धान्य गुडलक ट्रेडींग या नावाने भुसार मालाचे दुकान सेलू पाथरी रोडवर जि.प. शाळेच्या बाजूस फुलेनगर सेलू येथे असून सदरील धान्यातील गहु शेतक-याकडून घेतलेला आहे आणि तांदुळ एस.एस. ट्रेडींग कंपनी, औरंगाबाद यांचेकडून खरेदी केल्याचे कळवून सोबत पावत्या जोडून धान्य परत मिळण्यास विनंती केली असल्याने प्रकरणात जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 चे कलम 6 अ व शासन निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचे परिपत्रक दिनांक 30 ऑगस्ट, 2005 अन्वये प्रस्ताव सादर केला आहे.

करण्यासाठी 2. सदरील प्रकरणाची छाननी करण्यात येऊन गैरअर्जदार यांना जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम 6 (ब) नुसार पोलीस स्टेशनमार्फत नोटीस बजावण्यात येऊन प्रकरणातील जप्त धान्य व मुद्देमालाबाबत म्हणणे सादर दिनांक 08.10.2024, 17.10.2024, 23.10.2024 रोजी सुनावणी आयोजीत करण्यात आली. तसेच सुनावणीच्या वेळी पोलीस निरीक्षक, पो.स्टे. सेलू यांना म्हणणे सादर सादर करण्यासाठी कळविण्यात आले.

  1. त्यानुसार प्रस्तुत प्रकरणात सुनावणीची तारीख वेळोवेळी रोजनाम्यावरील नमुद करणानुसार देण्यात येऊन दोन्ही पक्षकाराकडून युक्तीवाद ऐकण्यात आला व प्रकरण 23.10.2024 रोजी आदेशाकरीता राखीव ठेवण्यात आले.
  2. प्रकरणात श्री. रुषीकेष पौळ, पुरवठा निरीक्षक सेलू यांनी दिनांक 13.09.2024 रोजीच्या पत्रकान्वये तहसीलदार सेलू यांनी सादर केलेला अहवालाप्रमाणे म्हणणे ग्राह्य धरण्यास विनंती केली. तसेच दिनांक 18.10.2024 रोजीच्या पत्रकान्वये जप्त धान्याचे नमुने तपासणीसाठी प्रादेशिक आरोग्य प्रयोगशाळा छावणी छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे पाठविण्यात आले असल्याचे म्हणणे सादर केले.
  3. गैरअर्जदार 01 व 02 तर्फे अॅड. आर.एन. काझी जप्त मुद्देमालाबाबत पुढीलप्रमाणे म्हणणे सादर केले की, गैरअर्जदार 01 व 02 हे भुसार मालाचे व्यापारी असून गैरअर्जदार यांच्याकडे रितसर शॉप लायसेन्य काढून गुडलक ट्रेडींग या नावाने दुकान आहे. गैरअर्जदार हे सदरील दुकानामार्फत गहु, तांदुळ, हरबरा, तुर, उडीद, मुग, सोयाबीन व इतर भुसार माल शेतक-यांकडून खरेदी करतात, तसेच एस.एस. ट्रेडींग कंपनी औरंगाबाद ही होलसेल ठोक मध्ये सर्व प्रकारचे धन्य विक्री करते. त्यामुळे गैरअर्जदाराने एस. एस. ट्रेडींग
  4. कंपनी औरंगाबाद येथून होलसेल दरात तांदुळ खरेदी करून आपले गुडलक ट्रेडींग या दुकानातून किरकोळ दरात विक्री करतात. त्यामुळे सदरील तांदुळ हा राशनचा अथवा शासकीय नाही. तसेच सदरील जप्त गहू हा गैरअर्जदारांनी गजानन ट्रेडींग या दुकानावर शेतक-याकडून खरेदी केलेला आहे. सदरील गजानन ट्रेडींग हे अजय शिवाजीराव दळवे यांच्या नावाने असुन त्यांचे नावाने कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथे सुध्दा परवाना आहे. त्यामुळे जप्त गहु हा शेतक-याकडून खरेदी केलेला असून तो शासकीय अथवा राशनचा गहू नाही. परंतु गावातील राजकीय व्देषापोटी कोणीतरी पोलीसांना खोटी व चुकीची माहिती दिल्याची दिसून येते. दिनांक 12.09.2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांनी कोणतीही शहानिशा न करता खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे छापा टाकून गैरअर्जदारांचा कायदेशीर गहु व तांदुळ जप्त करून जीवनावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुडलक ट्रेडींग ही जावेद शहा मीकाईल शाह, रा. सेलू यांच्या मालकीचे असून गजानन ट्रेडींग हे अजय शिवाजीराव दळवे यांच्या मालकीचे आहे. दोन्ही गैरअर्जदार यांच्याकडील असलेला गहू व तांदुळ खरेदीचे आणि TOSHIBA वजन काट्याचे बिल असून देखील प्रथम दर्शनी शासकीय असल्याचे निष्पन्न झाल्याशिवाय जप्त केला असल्याने अटी व शर्तीवर अथवा सुपुर्तनाम्यावर परत करण्यास विनंती केली आहे.
  5. पोलीस निरीक्षक, स्टेशन सेलू यांच्याकडून दिनांक 23.10.2024 रोजीच्या पत्रकान्वये पुढीलप्रमाणे म्हणणे सादर करण्यात आले. पोलीस स्टेशन सेलू येथे दिनांक 12.09.2024 रोजी फिर्यादी नामे पांडुरंग डिगांबर भारती वय 43 वर्षे व्यवसाय नोकरी सपोनि नेमणुक स्था.गु.शा.परभणी यांचे फिर्यादीवरून शासनाने गरीब लोकांना रास्तभावात वितरीत केलेला स्वस्त धान्याचा माल (राशनचा) तांदुळ 5674 किलो व गहु 2421 किलो हा अवैध बेकायदेशीररित्या स्वतःच्या आर्थिक फाय‌द्यासाठी चढ्या भावाने काळ्या बाजारात विक्री करण्याकरीता ताब्यात बाळगुन ठेवलेला वरीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला म्हणून आरोपी 1. जावेद शह मयकाईल शहा वय 32 वर्ष, धंदा मजुरी रा. आयशा कॉलनी सेलू 2. अजय शिवाजीरावा दळवे रा. फुले नगर सेलू यांचे विरोधात पोलीस स्टेशन सेलू गुरन 455/2024 कलम 3, 7 अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अन्वये गुन्हा दाखल झालेला असुन सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे. तपासाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या सुचनानुसार सेलू हद्दीत तपास केला असता सेलू तालुक्यातील एकही शासकीय गोदामातील शासकीय धान्य चोरीस गेलेले नाही. तसेच राशन दुकानदार यांचेकडील स्टॉक बाबत तपासकरणे सुरु असुन सध्या निवडणूकीचे कामकाज असल्याने
  6. पुरेसा वेळ उपलब्ध नाही. सदर मालाबाबत आरोपी यांचेकडे अधिक चौकशी केली असता सदरचा माल हा एस.एस. ट्रेडींग कंपनी औरंगाबाद या कंपनीकडून खरेदी केले असल्याच सांगत असून त्याचप्रमाणे बिल तपासणीकामी सादर केले असल्याचे लेखी म्हणणे सादर केले आहे.
  7. उक्त नमुद सर्व परिस्थिती लक्षात घेता तसेच दोन्ही पक्षकारांची लेखी व तोंडी युक्तीवाद पाहिला असता, खालीलप्रमाणे प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्रशन क्रमांक 01

कारणे

  1. प्रकरणात स्थानीक गुन्हे शाखा, परभणी पो.स्टे. सेलू यांच्यामार्फत करण्यात आलेली कारवाई ही केवळ संशयावरून करण्यात आलेली आहे. तसेच प्रकरणातील धान्य है शासकीय वितरण प्रणालीमधील आहे याबाबत कोणताही ठोस पुरावा अथवा प्राथमीक पुरावा सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेला नाही. तसेच स्थळ पंचानाम्यामध्ये देखील आढळून आलेला गहु व तांदुळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील पोत्यामध्ये आढळून आलेला नसुन तो राशन सदृश्य धान्याप्रमाणे दिसून येत असून परंतु खात्रीपूर्वक सांगता येत नसल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला असल्याचे नमुद केले आहे. यावरून स्थळ पंचनाम्याच्या ठिकाणी देखील सार्वजनिक वितरण प्रणालीमधील धान्य व त्याच्याशी निगडीत शासकीय बारदाना अथवा इतर शासकीय साहित्य आढळल्याचे निदर्शनास आले नाही.
  2. प्रकरणात गैरअर्जदार तर्फे अॅड. आर.एन. काझी यांनी पुराव्या दाखल पुढीलप्रमाणे कागदपत्रे सादर केली आहेत.
  3. एस.एस. ट्रेडींग कंपनी, औरंगाबाद यांचेकडील पावती क्रमांक 116 दिनांक 12.09.2024 रोजीची पावती.
  4. गजानन ट्रेडींग यांचकडील बुक् नं. 267, दिनांक 01.09.2024, बुक नं. 42 दिनांक 02.09.2024, बुक नं. 43 दिनांक 02.09.20.24, बुक नं. 44 दिनांक 03.09.2024
  5. प्रकरणात पोलीस स्टेशन सेलू यांच्यामार्फत सेलू तालुक्यातील शासकीय गोदामातून शासकीय धान्य चोरीस गेल्याचे तपासात आढळून आले नसल्याचे लेखी म्हणणे सादर
  6. केले आहे.
  7. प्रकरणात गैरअर्जदार 01 व 02 यांच्यातर्फे अॅड. आर. एन. काझी यांनी सादर केलेले लेखी म्हणणे व पुरावा कागदपत्रे तसेच पुरवठा निरीक्षक यांनी केलेला पंचनामा व पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन सेलू यांचा अहवाल इ. बाबी पाहता मी खालीलप्रमाणे आदेश पारीत करत आहे.
  8. आदेश…
  9. पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन सेलू यांच्यामार्फत शासकीय धान्य गोदाम येथे जमा करण्यात आलेले गैरअर्जदार 01 व 02 यांचे धान्य व मुद्देमाल अटी व शर्तीच्या अधिन राहून नियमानुसार आवश्यक त्या बाबीचा सुपुर्दनामा घेऊन परत करावे, व तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button