
श्रीराम प्रतिष्ठान संचलित अपूर्वा पॉलीटेक्निक येथे बजाज ऑटो लिमिटेड कंपनीचा अंतिम वर्षातील इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन कॅम्पस ड्राइव संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
बजाज ऑटो लिमिटेड कंपनी द्वारे एकूण ४२ विद्यार्थ्यांच्या मुलाखती ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आल्या,विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास,भाषा कौशल्य,विषय नॉलेज इत्यादि बाबी इंटरव्ह्यु द्वारे तपासणी करून सहा विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
अश्विनी चाळक, गणगे गोकर्णा,लहू पवार,ज्ञानेश्वर तौर,महेश पारधे व श्रेयश आर्द्रड या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव सौ. डॉ. सविताताई रोडगे,प्रशासकिय अधिकारी प्रा.महादेव साबळे,प्राचार्य प्रा. अशोक बोडखे, उपप्राचार्य प्रा. गजानन जाधव, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. गौतम इंगोले, सर्व विभागाचे विभाग प्रमुख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.