
दिव्यांग हक्क मोर्चा परभणी संघटनेच्यावतीने सेलु तहसीलदार यांना दिव्यांगांच्या मागण्यां बाबत निवेदन
आज दि. 03 मार्च सोमवार रोजी दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेच्यावतीने सेलु नायब तहसीलदार विजय मोरे यांना दिव्यांगांच्या मागील चार महिन्यांपासुन पगारी झाल्या नाही त्यामुळे सेलु तालुक्यातील दिव्यांगांच्या खात्यावर तात्काळ पगार ट्रांसफर कराव्या या मागणीचे निवेदन दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव खेडेकर यांच्यावतीने देण्यात आले..
यावेळी दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव खेडेकर,नगरसेवक मनिषभाऊ कदम,उपजिल्हाप्रमुख मोहनराव साखरे,उपतालुकाध्यक्ष ओमप्रकाश गात,तालुकासंघटक चंद्रशेखर शिंदे,रामेश्वर पौळ,ओमप्रकाश घोडके,मुक्तिराम मगर,रमेश तोडे,संतोष साळवे,रामकिशन देशमुख,दिपक वानरे,बालिका ठोंबरे,अंजना गायकवाड,दुर्गा बेंदरे आदी दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते..