
दिनांक 11 मार्च रोजी 11.30 वाजेच्या सुमारास दुधना नदी पात्रातून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैध्य पणे शासनाची कोणतीही परवानगी न घेता शासनाचा महसूल बुडवण्याच्या उद्देशाने अवैद्यरीत्या रेतीची चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना रोहिना ते सेलू जाणाऱ्या रोडवर रोहिना कडून येणाऱ्या दिग्रस वाडी गावाजवळ कॅनलच्या पुलाजवळ दिगर्सवाडी शिवार तालुका सेलू येथे एक हिरव्या रंगाचा हेड असलेला जॉन डीअर कंपनीचे ट्रॅक्टर हेड आणि केशरी रंगाची ट्रॉली विना नंबर असलेले व चालक वाहनासह मिळून आला म्हणून निलेश सत्यनारायण निर्मळ वय 30 वर्षे राहणार काजळी रोहिणा तसेच विष्णू श्रीरंग काष्टे राहणार काजळी रोहिना या दोन व्यक्तीवर पोलीस निरीक्षक दीपक बोरसे साहेबांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व पुढील तपास पीएसआय भाग्यश्री पुरी मॅडम यांच्याकडे देण्यात आला आहे.