आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत अद्या बाहेतीला कांस्यपदक..

परभणी (. ) जागतिक व भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या वतीने वडोदरा गुजरात येथे पार पडलेल्या जागतिक युवा टेबल टेनिस मालिकेत परभणी च्याआद्या पूजा महेश बाहेती ने भारताचे प्रतिनिधित्व करत अकरा वर्षे मुलींच्या वयोगटात उपांत्य फेरी खेळताना अवनी दुवा या खेळाडू सोबत (11-3, 11-8,7-11,9-11,9-11) असा निसटता पराभव स्वीकारावा ,यात कांस्यपदक वर समाधान मानून देशाला कांस्यपदक मिळवून दिले.या पदकासोबत तिने जिल्ह्य, राज्य व देशाचे नाव उज्वल केले.

  आद्या बाहेती खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र परभणी येथे प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांच्याकडे प्रशिक्षण घेते. तसेच अनिल बंदेल, सचिन पुरी, असद आली, अजय कांबळे  यांचे मार्गदर्शन मिळले तर ऐश्वर्या पाटील फिजिओ म्हणून आद्या सोबत कार्य करते. आद्या स्कॉटिश अकॅडमी या शाळेत इयत्ता चौथी मध्ये शिकते.
             या यशा बद्दल भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सरचिटणीस कमलेश मेहता,महाराष्ट्र राज्य टे.टे संघटना अध्यक्ष प्रवीण लुंकड, राज्य सरचिटणीस यतिन टिपणीस, संजय कडू, ॲड अशीतोष पोतनीस, आशिष बोडस,सर्व पदाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, कल्याण पोले, क्रीडा अधिकारी ननाकसिंह बस्सी, सुयश नाटकर, रोहन औढेंकर  परभणी जिल्हा अध्यक्ष समशेर वरपुडकर , जिल्हा सचिव तथा राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश माळवे, डॉ.माधव शेजुळ , संतोष सावंत, परभणी क्लबचे सचिव डॉ.विवेक नावंदर, पवन कदम, पियूष रामावत, तुषार जाधव, सूरज भुजबळ, रोहित जोशी,साक्षी देवकाते, भक्ती मुक्तावार या वरिष्ठ खेळाडू, पालक सराव सवंगडी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button