प्रतिनिधि सतिश आकात
सेलू येथील कै. आण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष अशोक नाना काकडे यांच्या वतीने सन्मान कर्तृत्वाचा वर्ष ३ रे या सोहळ्याचे आयोजन शनिवारी (दि. १३) सायंकाळी ६ वाजता साई नाटयगृहात करण्यात आले होते.
सेलू तालुका हे मराठवाड्यातील सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाणारे शहर आहे. अशा या सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या तालुक्याने समाजामध्ये अनेक हिरे घडवले आणि आशा बहुमूल्य व्यक्तींचा सत्कार म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमात गौरव करण्यात आलेल्या व्यक्ती सोबत त्यांच्या परिवारांचा सुद्धा गौरव करण्यात आला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. विजय भांबळे प्रमुख पाहुणे कवी इंद्रजीत भालेराव, पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता प्रसाद लांब, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, उद्योजक रामप्रसाद घोडके, अशोक नाना काकडे,संतोष कुलकर्णी, अशोक वाडकर, गोपाळ काबरा, प्रल्हाद कान्हेकर, दत्तात्रय(नाना) पावडे व सेलू तील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते. या समारंभात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तालुक्यातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला तसेच माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर यांचाही विशेष गौरव करून सन्मानितकरण्यात आले . याप्रसंगी डॉ. विरेंद्र नागोरी, सर्जेराव लहाने, नथुराम अंभोरे, वसंतराव डासाळकर, डी.डी. सोन्नेकर, प्रा. संजय पिंपळगावकर, शफीक अली खान, सोमेश्वर गिराम, रमेश माने, मोहन बोराडे, पुजा तोडकर, अॅड. सुनिता ढोले, सुप्रिया सोन्नेकर, राजेश धापसे, कलीमभाई बेलदार, नारायण काकडे यांचा कार्यक्रमात गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन बोराडे यांनी केले व तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वरूप अशोक उफाडे यांनी व्यक्त केले.