(प्रतिनिधी संदीप शिंदे पिंपरी राजा)
छत्रपती संभाजी नगर मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवार सोनिया गांधीची पिलावळ आणि उद्धव ठाकरे आहेत, अशा शब्दांत भाजप तालुका उपाध्यक्ष विक्रम पवार यांनी घणाघात केला आहे. मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार शरद पवार उद्धव ठाकरे गांधी व त्याच्या पिलावळाना नैतिक अधिकार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
नव्यानं गोळा करणार इम्पिरिकल डेटा; मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय हा शिंदे सरकारचाच आहे.
केंद्रीय मंत्री व सध्या जालना लोकसभेचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या सूचनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी अनेक मराठा हिताचे निर्णय घेतले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सारथी यांच्यामार्फत अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन त्यांच्या जीवनात नवचैतनत्यांच्या निर्माण केले .
उमेद सारखे अभियान महाराष्ट्र भर राबवून महिलेला आर्थिक उन्नतीचे साधन उपलब्ध करून दिले आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या रुग्णांना
मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत रुग्णसेवा करून त्यांना अनेक व्याधीपासून मुक्त केले अनेक मोठ मोठ्या केंद्रातील योजना राज्य शासना मार्फत मतदारसंघापर्यंत पोहोचवण्याचे काम रावसाहेब पाटील यांनी केली हे विसरता कामा नये आसेही ते म्हणाले?
मराठी बाण्यावर आणि मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार हा कल्याण काळे यांना नाही. कारण मराठा समाजाबद्दल त्यांना किती संवेदना आहे हे मराठा समाजाला आणि आम्हालाही माहिती आहे. ज्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण दिलं. हायकोर्टात ते चॅलेंज झालं, पण ते टिकवण्याचं काम देवेंद्रजी आणि केंद्र सरकारच्या रूपाने आम्ही केलं.
पण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते? उपसमितीचं अध्यक्ष कोण होतं? असा सवाल करत यांनी हे आरक्षण टिकवलं नाही. त्यामुळं मराठा समाजाचे खरे मारेकरी तुम्ही शरद पवार उद्धव ठाकरे सोनिया गांधी हेच आहात. त्यामुळं तुम्हाला यावर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना व त्यांच्या उमेदवाराला नाही.
मराठा समाजाच्या मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवणारे महिलांचा अपमान करणारे कोण होते? हे सकळ मराठा समाजाला माहिती आहे. म्हणून जे मराठा समाजाचं आरक्षण घालवायला जबाबदार तुम्ही आहात, ते आम्ही आता मिळवण्या साठीचा प्रयत्न केले होते पण तुम्ही त्यात यश मिळू दिले नाही केंद्रातील भाजपा सरकार आणि राज्यातील शिंदे सरकार मिळून क्युरेटिव्ह पेटिशन दाखल केली आहे.
आयोगाला इम्परिकल डेटा गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु केलं आहे. मराठा समाजाला आम्ही आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत.
जालना लोकसभेचे उमेदवार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना मतदार संघातील पाठिंबा बघता विरोधकाच्या पायाखालची वाळू सरकली असून आपले काही खरे नाही असे म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून पिंपरी राजा सारख्या गावातून रावसाहेब पाटील यांना हाकलून दिले असा बनावट व्हिडिओ करून लोकांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे
पिंपरी राजा सारख्या भागात रावसाहेब पाटील दानवे यांचा मतदार भेटीसाठी दौरा अजून निश्चित झाला नसतानाही असा व्हिडिओ वायरल करून विरोधक पोरकटपणा करत आहे
परंतु मतदारसंघात प्रत्येक गावात रावसाहेब पाटील दानवे यांचे जंगी स्वागत होताना बघण्यास मिळत आहे
पिंपरी राजा येथेही स्वागताच्या वेळेस 21 तोफाची सलामी देण्यात येईल
विक्रम पाटील पवार
तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजी नगर