प्रतिनिधि सतिश आकात
दिनांक ०४/०५/२०२४ रोजी दुपारी १२:०० च्या सुमारास सेलू येथील जिंतूर नाक्यावर असलेल्या तुळजाभवानी बँकेत मुंजाभाउ सुंदर गाडेकर राहणार रायपूर हे पैसे काढायला आले असता दोन आज्ञात आरोपींनी संगनमत करून १ लाख रुपये काढल्याची नोंद पासबुक वर करण्याकरिता काऊंटर रांगेत उभा असताना त्यांच्या बाजूला रांगेत उभा राहून ५००₹ दारच्या १०० नोटा असलेल्या एकूण ५०,०००/- रुपयाचे बंडल मुंजाभाऊ च्या पिशवी मधून हातचलाखीने काढून आज्ञात चोरटय़ांनी चोरून नेल्याची घटना घडली. या माहीत नुसार सेलू पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख ह्यांच्या कडे सोपवण्यात आला. पोलिसांनी लगेच बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे द्वारे तपासणी केली आहे.