जिंतूर परभणी मार्गावरील नागापूर गावाजवळील घटना
कौसडी प्रतिनिधी
आयशर टेम्पो व कारचा अपघात होऊन दोन जन गंभीर जखमीझाल्याची घटना दिनांक ७ मे मंगळवार रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
जिंतूर परभणी महा मार्गावरील नागापूर गावाजवळील करपरा नदीच्या पुलाजवळ आयशर टेम्पो क्रमांक एम एच 22 ए एन 45 95 आणि कार क्रमांक एम एच 22 ए एम 39 53 या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये कार मधील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले असून हा अपघात मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. जिंतूर वरून कौसडीकडे येत असलेले शेख अजर यांनी अपघातस्थळी थांबून 108 या क्रमांकवर संपर्क साधून ॲम्बुलन्स बोलवून घेतली शेख अजर यांनी इतर नागरिकांच्या मदतीने अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात पाठविले.
जिंतूर परभणी राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू आहे हे काम अद्यापही पूर्ण अवस्थेत झालेले नाही पुलाच्या दोन्ही बाजूनी अर्धवट रस्त्याचे काम झालेले असून एकतर्फी वाहने चालतात या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे अनेक अपघात घडत आहे ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी ब्रॅकेट लावलेले नसतात यामुळे देखील अपघात घडत आहे या गंभीर बाबीकडे गुत्तेदार व राजकीय लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.