सेलू प्रतिनिधि
राजीव गांधी नगर मधील नागरिकांना तात्काळ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांची मागणी
सध्या प्रचंड उन्हाची तीव्रता वाढली आहे मोठ्या प्रमाणावर प्रसारमाध्यमावर पाण्याची तीव्रता त्याबाबतची घ्यावयाची काळजी यासाठी प्रचंड प्रमाणावर जनजागृती चालू आहे. उष्णतेची मोठ्या प्रमाणावर भीती दाखवली जात आहे. पुरेशा प्रमाणात पाणी द्या सतत पाणी पीत जा अशा प्रकल्प सूचना वारंवार देण्यात येत आहेत परंतु राजीव गांधी नगर मधील अजिंठा कॉलनी तसेच टावर परिसरात या भागात अगदी पहिल्यापासून पालिकेने पाणीपुरवठा यंत्रणा या भागात सुरू केलेली नाही सतत ह्या भागातील लोक पाण्यासाठी इकडे तिकडे जाऊन पाणी भरत असतात. आता तर उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणावर वाढली आहे घरगुती बोरवेल सुद्धा आता कोरडे पडले आहेत. तेव्हा तात्काळ या भागात पालिकेने पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली नसता या भागातील नागरिकात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तेव्हा तात्काळ या भागात पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या या भागातील नागरिकांची पिण्याची पाणी अभावी होणारी गैरसमज टाळा या अशी मागणी या भागातील नागरिकांची आज नगरपरिषद येथे जाऊन निवेदन देऊन करण्यात आली आहे..