छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त सेलू शहरांमध्ये स्थानिक कलाकारांना घेऊन परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठे संगीतमय महानाट्य चे आयोजन सेलू जिंतूर विधानसभेचे आमदार सौ मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांनी केले होते.
आदिलशाही,कुतुबशाही,निजामशाही,मुघलचाही या राजवटीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे लोककल्याणकारी राज्य कसे असावे हे सर्व जगाला दाखवून दिले आई-वडिलांचे स्वराज्याचे स्वप्न यातून शिवजन्म ते राज्याभिषेक सोहळा असे कर्तुत्व व प्रेरणादायी पराक्रमाची शौर्यगाथांना उजळा देणारी स्वराज्य (गाथा शिवरायांची) या संगीतमय महानाट्य सादर करण्यात आले.
दिग्दर्शक अमर ठाकूर सह दिग्दर्शक सतीश आकात,प्रफुल्ल वैद्य व त्यांच्या संघातील 100 हून अधिक स्थानिक कलाकारांना रंगमंच उभा करून देण्यासाठी आमदार सौ मेघनाथ बोर्डीकर यांनी या महानाट्याचे आयोजन केले..
तसे या कार्यक्रमाचे आयोजन 06 जून रोजी करण्यात आले होते, परंतु पावसामुळे या कार्यक्रमात अडथळा आला होता. त्यानंतर या कार्यक्रमाचे दिनांक 16 जून रोजी परत आयोजन करण्यात आले त्या दिवशीही पावसाने या कार्यक्रमात अडथळा निर्माण केला परंतु सेलूच्या कलाकारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून आमदार सौ मेघना दीदी साकोरे यांनी सर्व कलाकारांना परत एकदा या कार्यासाठी प्रोत्साहन दिले. या नाटकातले अंगावर शहारे उभारणारे क्षण प्रेक्षकांनी पाहिले व सर्व कलाकारांना कौतुकाची दाद दिली.ह्या वेळी डॉ संजय दादा रोडगे ऍड दत्ताराव गणेश काटकर,अशोक अंभोरे,कपिल फुलारी,संदीप बोकन,पंकज निकम,प्रसाद महाराज काष्टे,शिवदास सूर्यवंशी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून सहकार्य केले