(प्रतिनिधी सतिष आकात)
सेलू शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 548 बी चे काम अत्यंत संत गतीने होत असल्याचे दिसून येत आहे एक वर्षाच्या वर कालावधी होऊनही पाच किलोमीटर अंतराचे काम पूर्णपणे संपलेले नाही सेलू येथील अनेक राजकीय पदाधिकारी व समाजसेवक द्वारे वारंवार इशारा देऊन आंदोलन करून सुद्धा देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले अखेर एक वर्ष अधिक कालावधी जाऊन सुद्धा सेलू करांना राष्ट्रीय महामार्ग म्हणतात.? अशा महामार्गाचे दर्शन कधी होईल.. याचा प्रश्न पडला आहे. या महामार्गावरील अनेक छोट्या गल्लीमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर अजूनही माती ने भर घालून लेवल करण्यात आली आहे.पाऊस पडल्याने तिथे चिखल होत आहे. आणि त्या ठिकाणी कचऱ्याचा ढेर ही पाहायला मिळत अनेक दुचाकी घसरून पडल्याचे वारंवार दिसत आहे. या राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे तर जणू काही दिवाळीलाच चालू होतील अशी शंका वाटायला लागली मागील एक वर्षाहूनही जास्त वेळ घेता राष्ट्रीय महामार्गाचे 100% काम पूर्ण पाहायला कधी मिळेल हा एक मोठा प्रश्न सेलूतील नागरिकांना पडला आहे.