आज दिनांक 10 जुलै रोजी
हिंगोली,नांदेड,परभणी मधील काही गावांना भूकंपाचे धक्के जाणवण्याची बातमी प्रसार माध्यमातून मिळतच होती. त्यात आज दिनांक 10 जुलै रोजी सकाळी 07 वाजून 16 मिनिटाच्या दरम्यान सेलू तालुक्यातील काही गावांमध्ये व शहरांमधील बहुतांश भागात भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता जास्त जरी नसली तरी आठ ते दहा सेकंदापर्यंत याची तीव्रता जाणवत होती अशी चर्चाया भूकंपाची बातमी लोकांमध्ये चांगलीच पसरली आहे.
मागील काही दिवसापूर्वी परभणी नांदेड हिंगोली मध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. आज झालेल्या भूकंपाच्या धक्क्याला हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर हे केंद्रबिंदू आहे असे माहिती मिळून आली भूकंप किती रिश्टर स्केल चा होता हे अजून समोर आले नसून लोकांमध्ये भीतीचं वातावरण समोर दिसून आले..