सेलु तालुक्यातील पिंपळगाव गोसावी येथे एका नराधमाने गावातीलच एका मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.याबाबत पीडित मुलीच्या आजोबाने जिंतुर तालुक्यातील चारठाणा पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध एफआईआर दाखल केला आहे
सदर प्रकरणी राज्याच्या गृहमंत्र्यांनी जातीने लक्ष्य घालुन आरोपीवर कठोर कार्रवाई करावी,अशी मागणी आज दिव्यांग हक्क मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबतच्या चारठाणा पोलिस निरीक्षकांमार्फत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर दिव्यांग हक्क मोर्चाचे अध्यक्ष अंकुश पांढरे,जिल्हाध्यक्ष गुलाबराव खेडेकर,विष्णु नाईकनवरे,प्रहारचे सेलु तालुकाध्यक्ष भागवत पाटिल,लक्ष्मीकांत उर्फ मुन्ना टाले आदिंच्या सह्या आहेत
दिव्यांग हक्क मोर्चाच्या वतीने गृहमंत्र्यांना निवेदन..