सेलूत खेळाडूसाठी राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होत आहेत – आमदार मेघना बोर्डीकर

सेलू (प्रतिनिधी):

ऑलिम्पिक स्पर्धेत आपणं कमी पडलो असलो तरी आपल्याला पुढच्या स्पर्धेची तयारी गावं खेड्यापासून करावीच लागेल. खेळ संस्कृती गाव - खेड्यापासून तयार व्हावी यासाठी सेलूत खेळाडूसाठी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होत आहेत याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन आमदार मेघना बोर्डीकर यांनी केले.

नूतन विद्यालय शिक्षण संस्था परिसरात खेळाडूसाठी इनडोअर क्रीडा हॉलचे काम प्रगतीपथावर आहे, त्याची पाहणी करण्यासाठी आ. मेघना बोर्डीकर यांनी केली. याप्रंसगी नूतन संस्थेचे अध्यक्ष डाॅ. एस.एम. लोया, सचिव डॉ व्हि.के. कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी , नंदकिशोर बाहेती, मकरंद दिग्रसकर , डाॅ. शरद कुलकर्णी,अँड श्रीकांत वाईकर दिनकर वाघ, रविंद्र डासाळकर, कपिल फुलारी, मुख्याध्यापक संतोष पाटील, सुखानंद बेडसुरे, के.के. देशपांडे, बी.डी. घोगरे,
उपस्थित होते.

या प्रसंगी बोलतांना आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, खेळ खेळणे हा निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याचा, लोकांशी संवाद साधण्याचा आणि खूप आनंद घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तथापि, पूर्ण लाभ मिळविण्यासाठी, आपणं नियमितपणे सराव करणे आवश्यक आहे - आणि नियमितपणे सराव करण्यास प्रवृत्त होण्यासाठी, त्यांनी अनुभवाचा पूर्ण आनंद घेतला पाहिजे. हे तेंव्हाच शक्य आहे जेव्हा ते त्यांचा आवडता खेळ आरामात आणि सुरक्षिततेने, सोयीस्कर वेळी आणि ठिकाणी खेळू शकतील. जेव्हा लोक त्यांच्या आवडीचा कोणताही खेळ कोणत्याही अनुकूल वातावरणात, वर्षाच्या कोणत्याही वेळी खेळू शकतात, यासाठी नूतन विद्यालय शिक्षण संस्था परिसरात होवू घातलेला इनडोअर हॉल नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश माळवे, तर आभार प्रदर्शन अनिल रत्नपारखी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.के.के. कदम, नागेश कान्हेकर,  प्रशांत नाईक, बाळू बुधवंत, राजेश राठोड,  आदींसह परीश्रम घेतले.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button