न.प सेलू येथील मनमानी कर्मचाऱ्यामुळे विभागीय आयुक्तांना निवेदन..

सेलू नप येथील ९०% कर्मचारी बाहेर गावाहून ये जा करीत आहेत त्यांच्या बाहेर गावाहून ये जा करण्यामुळे नप च्य कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे.
जे कर्मचारी बाहेर गावाहून ये जा करीत आहेत जास्त करून संवर्गातील (केडर) कर्मचारी आहेत संवर्गातील कर्मचारी असल्यामुळे स्वतःला क्लास वन अधिकारी समजत आहेत. ते नप मध्ये इतर कोणत्याही विभागात काम करण्याची त्यांची तयारी नसते, सर्वांना वाटते आपल्याला मोठे विभागातील पद मिळावे व तसे पद त्यांनी हस्तगत देखील केलेले आहे परंतु ते आपल्या पदावर कधीच पूर्ण वेळ काम करीत नाहीत जेव्हा रेल्वे येईल तेव्हा कामावर येतात व लगेच १-२ तासाने दुसऱ्या रेल्वेने निघून जतात त्युळे नप क्या बऱ्याच काम काजवर परिणाम होत आहे.

मध्ये बऱ्याच ठिकाणी विकास कामे चालू आहेत त्यामध्ये रोडचे काम देखील सुरू आहे सध्या राजीव गांधी नगर येथिल सिपेंट रोड टाकण्याचे काम सुरू आहे. ते रोडचे काम सुरू होण्यापूर्वीपिण्याच्या पाण्याची पाईप लाईन काढून बाजूला घेणे अपेक्षित होते परंतु अभियंता सचिन घुले हे बाहेर गावाहून ये जा करीत असल्यामुळे त्यांना साईटवर जाण्यासाठी वेळ मिळत नाही
व त्यांच्या हाताखालील कर्मचारी सुद्धा आपली जबाबदारी पूर्ण करीत नाहीत त्यामुळे राजीव गांधी नगर येथिल नागरिकांना गेल्या एक महिन्यापासून पिण्याचे पाणी नाही घुले यांच्या निष्काळजी पणामुळे व आपसतले हेवेदावे यामुळे सामान्य जनतेला त्रास लागत आहे.

तसेच नूतन कॉलेज रोड व इतर भागांमध्ये सुद्धा सचिन घुले यांच्या निष्काळजी पणामुळे गेल्या ४ महिन्यापासून पाणी पुरवठा बंद आहे. तरी आपण जातीने याकडे लक्ष देऊन नवीन पाईप लाईनचा नियोजन लाऊन लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा.
तसेच इतर विभागातील कर्मचारी जे बाहेर गावाहून ये जा करीत आहेत ते सुद्धा कधीही आपल्या टेबल ला उपस्थित राहत नाहीत त्यामुळे लोकांना आपल्या कामासाठी १०-१५ दिवस चकरा माराव्या लागत आहेत.
मागील ८-१० दिवस पूर्वी मी सचिन घुले यांची भेट घेण्याकरिता त्यांच्या कार्यालयात गेलो असता ते बाहेर गावाहून आले नाही असे मला सांगण्यात आले, त्यांची रजा आहे का हे विचारण्यासाठी मी आस्थापना विभागात गेलो असता आस्थापना विभाग प्रमुख हे सुद्धा बाहेर गावाहून आलेले नव्हते, त्यांची तक्रार करण्यासाठी मुख्याधिकारी यांच्या कक्षात गेलो असता मुख्याधिकारी देखील कक्षात उपस्थित नव्हते मुख्याधिकारी कुठे आहेत हे विचारण्यासाठी उपमुख्याधिकरी यांच्या कडे गेलो असता ते पण आपल्या कक्षात उपस्थित नव्हते.

तसेच बाहेर गावाहून ये जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गेल्या ४-५ वर्षापासून बायोमेट्रिक थंब मशीन जाणून बुजून बंद पडलेले आहे त्या मशिनची जबाबदारी कुणाकडे होती याची चौकशी करून संबंधितावर कार्यवाही करावी व बायोमेट्रिक मशीन सुरू करण्यात यावी.
तसेच बाहेर गावाहून ये जा करनारे कर्मचारी स्वतःला क्लास वन अधिकारी समजत असल्यामुळे तहसीलचे Blo चे काम आले होते त्यांनी स्वतःची नियुक्ती पत्र न देता स्थानिक सफाई कर्मचारी व शिपाई कर्मचारी यांचे तहसीलदार साहेबाना नियुक्ती पत्र देऊन सफाई कर्मचारी व शिपाई कर्मचारीयांची BLO म्हणुन नियुक्ती करण्यात आली
यांची BL0 म्हणुन नियुक्ती करण्यात आली त्यांची नावे १) आबासाहेब नखाते, सफाई कामगार २) भगत संतोष, सफाई कामगार ३) नीलकंठ मोगल, सफाई कामगार ४) भागवत इंद्रोके,शिपाई ५) उमाकांत बेंद्रे शिपाई ६) सोमेश्वर भुलांगे,शिपाई ७) रंगरेज अन्सर, शिपाई ()शेख रहीम शेख मुसा,शिपाई ९) अखिल शब्बीर, शिपाई हे ९ कर्मचारी सफाई व शिपाई यांच्या BL0 नियुक्त्या रद्द करुन वर्ग ३ किंवा संवर्गातील कर्मचाऱ्यांची नियुक्त्या करण्यात यावी

तसेच बाहेगावाहून येणाऱ्या व सर्वच कर्मचारी कार्यालयीन वेळ ९:४५ ते ५:४५ या वेळी प्रमाणे कार्यालयात राहणे साठी त्यांना आदेशित करण्यात यावे
तसेच सर्च कर्मचाऱ्यांसाठी नप मध्ये मुव्हमेंट (हालचाल) रजिस्टर ठेवण्यात यावे व प्रत्येक कर्मचाऱ्यांची येण्या जाण्याची नोंद या रजिस्टर ला घेण्यात यावी

बाहेर गावाहून ये जा करणारे कर्मचारी हे खालील प्रमाणे आहेत.कर्मचार्याचे नाव,पद,जेथून येतात त्या गावाचे
नाव

वरील १७ कर्मचारी हे बाहेगावाहून ये जा करीत आहेत त्यांच्यामुळे नप क्या सर्वच कर्मकाजव परिणाम होत आहे तसेच वरील सर्व १७ कर्मचारी दरमहा अंदाजे १,२०,०००/- कर्मचाऱ्यांची ऑक्टोबर २०२४ पर्यंत बेकायदेशीरित्या उचललेला घर भाडे भत्ता व्याजासह वसूल करण्यात यावा व नोव्हेंबर २०२४ पासून त्यांना घर भाडे भत्ता देण्यात येऊ नये.
एका नगर परिषद मध्ये मुखाधिकारी व उपमुख्याधिकारी व 17 कर्मचारी जर बाहेर गावाहून ये जा करीत असतील तर ती नगर परिषद कशी चालत असेल? याचा आपणच विचार करावा.
तसेच सेलू शहरातील राजीव गांधी नगर व कोलेजरोड येथील नवीन पाईप लाईन टाकून पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यात यावा तसेच जो पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तो पर्यंत दिवसाला ३ टेंकरणे पाणी पुरवठा करण्यात यावा.
तसेच उपरोक्त १७ कर्मचाऱयांना मुख्यालायी राहण्याचे आदेश करण्यात यावे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button