सेलूचे माजी नगराध्यक्ष श्री.विनोद बोराडे यांच्या विनोद बोराडे मित्र मंडळ व जनशक्ती विकास आघाडी पक्षा तर्फे जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्री विजय भांबळे यांना जाहीर पाठिंबा.
आज सेलू येथे विनोद बोराडे मित्र मंडळातर्फे आयोजित विनोद बोराडे यांच्या समर्थकांच्या बैठकीत जिंतूर विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्री.विजयरावजी भांबळे यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी अशोक नाना काकडे, राजेंद्र लहाने,विनायक पावडे, प्रमोदराव भांबळे, प्रेक्षाताई भांबळे, बाळासाहेब भांबळे,अजय भैय्या चौधरी, अशोकराव चौधरी, कृष्णा देशमुख,विनोद राठोड,सुधाकर रोकडे, मनोज मते, बोराडे परिवारातील जेष्ठ सदस्य श्री अंकुश आबा बोराडे, श्री नामदेवराव बोराडे, श्री भरतराव बोराडे, सेलू तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री. मुकेश भाऊ बोराडे, सेलूचे माजी नगराध्यक्ष श्री.विनोद बोराडे, युवा नेते श्री.साईराज भैय्या बोराडे, माजी नगराध्यक्ष श्री.मारुती चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष श्री प्रभाकर सुरवसे, माजी नगरसेवक श्री.मिलिंद सावंत, वहिदभाई अन्सारी , श्री गौतम धापसे, बबन गायकवाड, रमेश दौड सचिन कोरडे,बालाजी सरकाळे, राजेंद्र पवार झोडगावकर, व्यंकटबापू चव्हाण, लक्ष्मण बुरेवार, सतीश जाधव, आयुब भाई, कासीमभाई आदी मान्यवर उपस्थित होते.