दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ३:३० त्या दरम्यान सेलू येथील निम्न दुधना पाटबंधारे विभागामध्ये कार्यरत असलेल्या बाळू दिनकर मार्गे हे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. या कार्यालयात जाऊन ज्ञानेश्वर विलासराव शेजुळ राहणार आंबेगाव या व्यक्तीने दारू पिऊन बाळू मार्गे यांना म्हणाले की कामाची मोजमापन पुस्तिका कुठे आहे असे विचारले असता फिर्यादी मी सांगितले की मोजमापन पुस्तिका ही त्रुटी पूर्तता करून विभागीय कार्यालय जालना येथे जमा केली आहे तेथे जाऊन विचारपूस करा असे म्हणला असता आरोपी शिवीगाळ करून मार्गे यांना काम करीत असताना टेबलावरून बाजूला घेऊन शासकीय कामात अडथळा निर्माण करून दोन्ही हाताने गळा पकडून थापड बुक्कीने मारहाण करून तू जर बिल काढले नाहीस तर तुला व तुझ्या कुटुंबीयाला जीवे मारून टाकेल अशा जीवे मारण्याच्या धमकी दिली सदरील व्यक्तिने शासकीय कार्यालयात काम करीत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून पोलीस स्टेशनमध्ये सेलू येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे साहेब यांच्या आदेशाने २०२/२०२४ कलम ३५२,३२३,५०४,५०६ अशा कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..