@ वासंतिक बाल संस्कार शिबीर
सेलू / प्रतिनिधी
येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबेजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात दि.११एप्रिल ते १५ दरम्यान वासंतिक बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या समारोपा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन बोलताना सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंद देशमुख म्हणाले की,संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार व दोषांचा भागाकार आहे.मनन करून ,विचार करून कृती करतो तो मानव.विचार व कृती योग्य होण्यासाठी संस्काराची गरज असते.पूर्वी आजी आजोबा हेच संस्काराचे विद्यापीठ होते.एकत्र कुटुंब पद्धतीत संस्कार आपोआप बालकात रुजत होते.आजच्या धकाधकीच्या जीवनात संस्काराची शिदोरी देणे क्रमप्राप्त झालेआहे. संस्कार व संस्कृती संवर्धनासाठी व बदलत्या काळाच्या अनुषंगाने संस्कार शिबिरे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.व्यासपीठावर स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी ,स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लूरकर ,पालक शिक्षक संघाच्या रामकौर घनवट ,मुख्याध्यापक शंकर शितोळे यांची उपस्थिती होती.
वासंतिक शिबिरात सकाळच्या सत्रात विजय चौधरी यांनी व्यायाम व सूर्यनमस्कार घेतले.उमाताई गोपेगावकर यांनी रामरक्षा व मारूती स्तोत्र शिकविले.कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे कलाशिक्षक पांडुरंग पाटणकर यांनी आर्ट व क्राफ्ट च्या वस्तू कश्या बनवायच्या ते सादर केले.सौ.ज्योती अग्रवाल यांनी डान्स चा सराव घेतला.कुकिंग विथआऊट गॅस हे सत्र प्रशालेतील शिक्षिका यांनी घेतले.प्रिन्स अकॅडमीचे महादेव बोरकर यांनी चित्रकलेचा सराव घेतला.शालवी जोशी यांनी पद्य पाठांतर घेतले. तसेच सकाळी रोज न्याहारी देण्यात आली.
दुपारच्या सत्रात ह.भ.प.योगेश महाराज साळेगावकर ,भगवान पावडे ,कीर्ती राऊत ,अनिल रत्नपारखी यांनी विद्यार्थ्यांना बोधात्मक कथा सांगितल्या.सेवानिवृत्त मुख्याध्यापक नामदेव घुगे यांनी लेझीमचा सराव घेतला.समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. समारोपाचे सूत्रसंचालन अनिल कौसडीकर ,प्रास्ताविक रागिणी जकाते ,आभार शंकर शितोळे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिबीर प्रमुख विनोद मंडलिक ,शंकर राऊत ,दीपाली पवार ,शारदा पुरी ,काशिनाथ पांचाळ ,चेतन नाईक ,चंदू कव्हळे ,स्वप्नाली देवडे ,सोनाली जोशी ,निकिता निर्वळ ,रसिका बावणे ,अभिजित पाचंगे ,दत्ता गिरी , दिगंबर खुळे यांनी प्रयत्न केले.