सेलू प्रतिनिधी
सेलू शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून
श्रीराम मूर्ती ची भव्य मिरवणुकीत सुरुवात झाली. मठ गल्ली दत्तनगर सारंग गल्ली बालाजी मंदिर लोकमान्य टिळक अशी मिरवणूक काढून
या मिरवणुकीमध्ये मूख्य आकर्षण ठरले ते दिल्ली येथील विशाल अघोरी यांचे अघोरी पथक अघोरी पथकाला पाहण्यासाठी शेलुतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती हे अघोरी पथक या मिरवणुकीतील मुख्य आकर्षण ठरले व तसेच मूलींचे लेझीम पथक, मोठ्या आवाजाच्या तोफा रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी,
श्रीराम व शिवछत्रपतींची भव्य मूर्ती, श्री श्रीरामायणाचा जिवंत देखावा या मिरवणूक सादरीकरण करण्यात आले होते तर जय श्रीराम जय जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोष युवक करत होते मिरवणूक शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान शिवभक्तांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासमोर हजारोच्या संख्येने या सामूहिक आरतीने समारोप करण्यात आला
सदरील शोभायात्रा शिवभक्तांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली सेलू शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.
कूठल्याही प्रकारच्या राजकीय हस्तक्षेपाशिवाय सर्वसामान्य शिवभक्तांनी स्वयंशिस्तीचे प्रदर्शन घडवून आणले व श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या माध्यमातून शोभायात्रा पूर्ण ताकदीने पार पाडली.