कौसडी प्रतिनिधी
जिंतूर तालुक्यातील बोरी येथे चार्जिंग च्या स्कुटीने अचानक पेट घेतल्याने स्कुटी पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना दिनांक 29 एप्रिल सोमवार रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडली.
बोरी येथील डॉ.अभिषेक संतोष कुमार घुले यांनी त्यांची चार्जिंग ची स्कुटी त्यांच्या हॉस्पिटल समोर लावली असता स्कुटीने अचानक पेट घेतल्याने स्कुटी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. आग इतकी मोठी होती की आग विझवण्यासाठी जवळ जाण्यास कोणी तयार नव्हते म्हणून ही स्कुटी पूर्णपणे जळून खाक झाली यामध्ये अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे डॉ.अभिषेक संतोष कुमार घुले यांनी सांगितले. मागील अनेक दिवसापासून इलेक्ट्रिक स्कुट्या जळण्याच्या अनेक घटना समोर येत आहे.