सेलू प्रतिनिधी
दिनांक २९ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७:३० दरम्यान सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे गावातील मोरेश्वरी मंदिरात जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या असता आरोपी राजेभाऊ उर्फ अशोक मारोतराव मगर यांनी आपल्या सख्या लहान भावास मधुकर मारोतराव मगर यास जमीन परत घेतल्याच्या कारणावरून धारदार चाकूने गळ्यावर व छातीवर वार करून त्याचा खून केलेला आहे. मधुकर मगर यांच्या पत्नी अलका मधुकरराव मगर यांच्या फिर्यादीनुसार पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशान्वये सेलू पोलीस स्टेशन येथे २३७/२०२४ कलम 302,323 सह कलम ४/२५ आर्म्स अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. व सदरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जटाळ यांच्याकडे देण्यात आला आहे.