सेलू ( प्रतिनिधी )
प्रतिवर्षा प्रमाणेच यावर्षी देखील यावर्षी देखील शहरातील पांडे गल्ली मधील नरसिंह मंदिर मध्ये नरसिंह जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे .
या जन्मोस्तवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
दि १३ पासून या जन्मोत्सवास प्रारंभ झाला असून दररोज श्री च्या मूर्तीस अभिषेक व रात्रौ येथील गुरुवार पाठ मंडळाच्या वतीने गणपती अथर्वशीर्ष ,रामरक्षा , भगवत गीता अध्याय ,तसेच विष्णू सहस्त्र नामावली चे पठण केले जात आहे .
दि २१ मे या जन्मोत्सवाचा मुख्य दिवस असून त्यादिवशी सकाळी श्री च्या मूर्तीस अभिषेक ,सायंकाळी सात वाजून तीन मिनिटांनी नरसिंह जन्म होणार आहे .यावेळी वेद शास्त्र संपन्न तसेचभागवताचार्य नागनाथ महाराज विडोळीकर ( जोशी ) यांच्या सुश्राव्य व अमृततुल्य रसाळ वाणीमधून नरसिंह जन्म अध्यायाचे वाचन केले जाणार आहे .यानंतर महाआरती व तीर्थ प्रसाद वाटप केला जाणार आहे .
तसेच रात्रौ साडेनऊ वाजता “श्री” ची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे .
दि २२ मे रोजी दु १ ते ३ यावेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .तसेच दि २३ मे रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ” पिठलं भाकर ” प्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे .
दि २४ मे रोजी रात्री आठ वाजता गुरुवार पाठ मंडळाच्या वतीने विडा भजनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे .
संकटात सापडलेल्या आपल्या भक्त प्रल्हाद या भक्तांच्या हाकेसरशी धावून आलेला विष्णूचा हा अत्यंत जाज्वल्य असा चौथा अवतार असून आजही मनोभावे सेवा केल्यानंतर संकटातून सोडवणार यामुळे अनेक भाविक भक्त याची मनोभावे सेवा करतात .व या नवरात्र महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होत असतात .
तरी या सर्व कार्यक्रमात सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानच्या वतीने पुजारी अनंत पाटील ,केशव पाटील ,नारायण पाटील व देविदास पाटील यांनी केले आहे .