नगर पालिकेची कारवाई शुन्य त्यामूळे मानवतकरांचा कचरा रस्त्यावर..
मानवत / प्रतिनिधी
मानवत शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच गल्लीबोळा मध्ये मानवत नगर पालिकेच्या सफाई विभागा दंडात्मक कारवाईच्याआदेशाला नागरिकांनी खो दाखविला असून त्यामूळे मानवत शहरातील सूज्ञ नागरिकांच्या पुढाकाराने मानवत शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यामूळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत नगर पालिकेच्या सफाई विभागामध्ये घंटा गाड्या व टॅक्टर द्वारे प्रत्येक वार्डात सकाळी घंटा गाडी व टॅक्टर फिरवण्यात येत आहे.
तरी ही मानवत शहरातील सूज्ञ नागरिक निष्काळजी पणे भर रस्त्यावर घाण व घरातील केर कचरा रस्त्यावर जमा करीत आहेत.
मानवत शहराती मुख्य रस्त्यावर असलेल्या कापड बाजार चौक परिसरा मध्ये असलेल्या कोपऱ्यावर या परिसरातील सुज्ञ नागरिक सकाळी भल्या पहाटे मंत्री चौकात येऊन चौकात घाण व केरकचरा टाकून मोकळे होत आहे.
तसेच या बरोबर परिसरातील व्यापारी वर्ग ही आपल्या दुकानातील केर कचरा , घाण टाकून परिसर घाण करत आहे. शहरात याच रोड वर पुढे मंत्री गल्ली , संभाजी पेठ , क्रांती चौक , सावरकर नगर , या भागाकडे जावे लागते. मंत्री गल्लीतील याच कॉर्नरवर टाकण्यात आलेल्या केर कचरा घाणीतून नागरिकांना कचरा पायदळी तूडवित पुढे जावे लागते. ज्या ठिकाणी घाण टाकली जाते त्याच्या दोन फूटाच्या अंतरावर पान विकणारा तांबोळी आणि किराणा मालाचे भूसार दुकान आहे. त्या बरोबर इतर दुकाने ही या परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत. रस्त्यावर टाकलेल्या केर कचर्याच्या घाणीतुन येणाऱ्या दुर्गंधीयूक्त वासामधून नागरिक व व्यापारी त्रस्त आहेत. मानवत पोलीस स्टेशन समोरील राठोड गल्लीतील बोळी ( गल्ली ) मध्ये पोकळे यांच्या गोदामा समोर या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणे येऊन घाणकचरा टाकून दुर्गंधी पसरवीत आहे.
पोकळे यांनी वेळोवेळी या परिसरातील नागरिकांना विनंती वजा सूचना करून ही काही उपयोग होत नाही.
तर शहरातील मंत्री गल्लीच्या कॉर्नर वर टाकलेल्या घाणी संदर्भात अनेक वेळी पत्रकारांनी व सुज्ञ नागरिकांनी मानवत नगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना व विभागाच्या कर्मचाऱ्यांना वेळो वेळी सांगून त्यांच्या निदर्शनास आणून ही काही उपयोग होईना.
परभणी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात उघड्यावर केरकचरा व घाण टाकणाऱ्या नागरिकावर दंडात्मक कठोर कारवाई करण्यात येत आहे व आर्थिक दंड ही वसूल केले जात आहे.
अशाच प्रकारची कारवाई मानवत नगर पालिकेच्या सफाई विभागाच्या वतीने कठोर कारवाईचे शस्त्र हाती घ्यावे.
अशी मागणी मानवत शहरातील सामान्य नागरिकांच्या वतीने होत आहे.