सेलू प्रतिनिधी
आज वृक्ष लागवड व संवर्धन मोहिमेचा शुभारंभ सेलू येथील अत्रेनगर भागातील वृक्ष पालक नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेत परिसरातील मोकळ्या जागेत स्वदेशी वृक्षांची लागवड करत लावलेली झाडे जोपासण्याचा संकल्प केला.या उपक्रमाचा शुभारंभ तीन पिढीचा संगम करत जेष्ठ महिला श्रीमती लक्ष्मीबाई व्यंकटराव सराफ व परिसरातील लहान मुले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. या उपक्रमासाठी सेलू शहरातील विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.हरित महिला मंडळाच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन मोहिमेला बळकटी यावी यासाठी स्वेच्छेने रू.१५०००/- देणगी देत पर्यावरणाविषयी आस्था व्यक्त केली.या मोहिमेत सहभागी सेलू येथील इंजिनिअर्स कंसलटिंग असोसिएशन यांनी रू.११००० जाहीर करत वृक्ष लागवड व संवर्धन मोहिमेत सक्रिय योगदान देण्याचे ठरवले आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून अत्रे नगर परिसरात ५१ वृक्षाची लागवड करून पुढील दिवसात टप्याटप्याने वृक्ष लागवड व लावलेल्या वृक्षाचे संवर्धन करण्याचा ध्यास घेत उपक्रमाची सांगता करण्यात आली.या उपक्रमासाठी श्री शशिकांत दादा देशपांडे,श्री व सौ.विठ्ठलराव तातेराव डख,सर्वश्री ज्ञानेश्वर डख रामप्रसाद डख,श्री व सौ संजय विटेकर,श्री देविदास विटेकर, श्री कल्याण सराफ श्री व सौ. सारंग सराफ श्री कृष्णा देशमुख श्री व सौ.योगेश महाराज साळेगावकर,श्री रमेशराव पुर्णेकर, श्री व सौ शरद बापू देशमुख,इंजि.सर्वश्री कोलते साहेब,नाईकवाडे साहेब,गजमल साहेब,बलदवा साहेब,पत्रकार प्रतिनिधी श्री श्रीपाद कुलकर्णी,श्री शिवाजी आकात,श्री कुलकर्णी,दिग्दर्शक श्री निशांत धापसे,श्री शिवकुमार नावाडे,श्री रितेश मंत्री,श्री सुजित मिटकरी,श्री सचिन रत्नपारखे,श्री मनु गुरू,श्री.अभिजित राजूरकर,महिला मंडळाच्या सदस्या सौ कोमल काला, सौ.रूपा काला, श्रीमती.ललिता गिलडा,सौ कांचन बाहेती,सौ.लोकूलवार,चंदा मेहता,सौ.रश्मी बाहेती,सौ.काळे, सौ.स्वप्नाली राजूरकर यासह मोरया प्रतिष्ठान परिवाराचे सहकारी आणि वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य उपस्थित होते.या उपक्रमात सेलूकरांनी उस्फूर्तपणे प्रत्यक्ष सहभाग नोंदवून सेलू शहर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धन करण्यासाठी तन मन धनाने प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.