सर्व गुणवंत विद्यार्थी व श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समिती
आरक्षणाने समाज प्रबळ न बनता दुबळा होतो.त्यासाठी ब्राह्मण समाजाने कधीच आरक्षण व संरक्षण न मागता सतत ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले असे प्रतिपादन परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी सेलू येथील ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून केले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते श्री.गोविंद भाऊ जोशी उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष श्री बाजीराव भैया धर्माधिकारी,पुणे येथील प्रसिद्ध मूर्तिकार सौ अश्विनीताई मंडलिक ब्राह्मण सभेचे नेते श्री दीपक रणवरे श्री के बा शि संस्थेचे उपाध्यक्ष डॉ सुनील कुलकर्णी ज्येष्ठ नागरिक श्री रामराव सावंगीकर मामा, प्रसिद्ध साहित्यिक व शिक्षिका डॉ जयश्री सोन्नेकर आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मंत्रघोषात भगवान श्री परशुरामाच्या मूर्तीचे व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दिपक प्रज्वलन करण्यात आले. सौ.सीमा आष्टीकर यांनी यावेळी स्वागत गीत सादर केले. यावेळी समाज भूषण म्हणून संगीत क्षेत्रातील श्री यशवंत चारठाणकर, क्रीडा क्षेत्रातील श्री देवीदास सोन्नेकर, आध्यात्मिक क्षेत्रातील ह भ प प्रा संजय पिंपळगावकर यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ अनुपमा जवळेकर यांनी श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या कार्याचे व समाजातील तरुणांनी निस्वार्थ भावनेने एकत्र येऊन समाज एकसंघ करण्याच्या प्रयत्नाचे कौतुक केले. तसेच महिला एकीकरणाबाबत समाजात चालू असलेल्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. ह भ प प्रा संजय पिंपळगावकर क्रीडा शिक्षक श्री देविदास सोन्नेकर यांनी सत्काराला उत्तर देताना सेलू शहरात चालू असलेल्या श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या कार्याचे अभिनंदन केले. व या सत्कारामुळे निश्चितच आमची जबाबदारी वाढली असून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप बसली आहे. असे स्पष्ट केले यानंतर समाजातील क्रीडा तसेच दहावी – बारावी व बी टी एस व विविध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या पालकांसमवेत सन्मान करण्यात आला. सौ अश्विनी ताई मंडलिक यांनी देखील मनोगतात सेलूच्या श्री.भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या कार्याचे कौतुक करून वेद आणि ब्राह्मण याबाबत आपण लवकरच एक उपक्रम राबवणार आहोत व त्यासाठी सर्व समाजाचे सहकार्य अपेक्षित आहे असे मत व्यक्त केले. यावेळी श्री दिपक रणनवरे म्हणाले की सध्या परिस्थिती अशी आहे की सध्या केवळ गुण मिळवणे यातून समाधान आहे पण उत्तम व्यक्ती म्हणून या सर्वांवर मोठी जबाबदारी आहे. उत्तम मनुष्य घडवावा यासाठी हा कार्यक्रम आवश्यक आहे. समाजात जबाबदार नागरिक देखील घडले पाहिजेत असे त्यांनी सांगितले आहे. अध्यक्षीय समारोपात शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते श्री गोविंद भाऊ जोशी म्हणाले की गुणवंताचा सत्कार हा विद्यार्थ्यांचा प्रेरणा देणार आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःचा मार्ग निवडायला हवा विद्यार्थ्यांनी स्वयम अध्ययनाकडे लक्ष द्यायला हवे आरक्षण हा मुद्दा ब्राह्मण समाजाने कधी मागितला नाही. ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांनी देवी सरस्वतीच्या आराधनेकडे लक्ष देऊन विद्याज्ञानाकडे लक्ष द्यायला हवे यावेळी मराठी भाषेच्या अचूकतेकडे श्री गोविंद भाऊ जोशी यांनी लक्ष वेधले विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनी देखील ज्ञानार्जन करताना उत्तम शिक्षण घेऊन उत्तम शिक्षण द्यावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वर्षा राजवाडकर यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन श्री गजानन मुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री बालाजी देऊळगावकर यांनी मानले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.