आयशर जाळून खाक शॉट सर्किट मुळे लागली आग
जोगवाडा येथील घटना
जिंतूर /प्रतिनिधी
तालुक्यातील जोगवाडा येथे कडबा भरून जाणाऱ्या आयशर वाहनाचा विद्युत ताराला घर्षणामुळे शॉर्ट सर्किट होऊन कडब्यासह आयशर जळून खाक झाल्याची घटना दिनांक 8 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली आहे
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा येथून आयशर वाहन क्र MH 07 C 5329 मध्ये कडबा भरून जोगवाडा गावातून जात असताना लोंबकळणाऱ्या तारेला धक्का लागल्यामुळे शॉर्टसर्किट झाल्यामुळे अचानक चालत्या आयशर वाहनातील कडब्याने पेट घेतला यावेळी भरवस्तीत कडब्याने पेट घेतल्यामुळे मोठे नुकसान होईल म्हणून चालकाने प्रसंगावधान राखत आयशर वाहनाला गावाच्या बाहेर नेऊन उभे केले यामुळे मोठा अनर्थ टळला दरम्यान गावातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात आली नाही यावेळी घटनास्थळी अग्निशमन दालने हजर होऊन आग आटोक्यात आणली मात्र कडब्यासह आयशर पूर्णतः जळून खाक झाले आहे घटनेत लाखोंचे नुकसान झाले आहे