सेलू तालूका प्रतिनिधी.
कर्नाटक,महाराष्ट्र,आंध्र प्रदेश, गोवा,मध्य प्रदेश, दिल्ली या राज्यामधील विविध क्षेत्रातील गुणवंतांना गौरवण्यात आले.
सेलू : दि.7 एप्रिल रोजी सेलू येथील नूतन कन्या प्रशालेचे सेवानिवृत्त ग्रंथपाल डॉ.शिवाजी रामभाऊ शिंदे यांना एम के फाउंडेशन दिल्ली व दैनिक विशाल क्रांती यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये आदर्श ग्रंथपाल जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. संयोजन कमिटी यांच्याकडून पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले असून दिनांक 7 एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी मा.अमोल येडगे,जिल्हा पोलीस प्रमुख मा.महेंद्र पंडित,सौ.निता बोन्दर्डे, खोतवाडी सरपंच विशाल कुंभार,तंटा
मुक्ती अध्यक्ष खोतवाडी अमोल माने,विशालक्रांती न्यूज चे संपादक अप्पासाहेब भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुरस्कार हे नेहमी आपल्याला उत्तम कार्य करण्याची प्रेरणा देतात.आपण आपल्या शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक,पालक,विद्यार्थी यांच्या मध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आपल्या कार्यकाळात विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले.समाजातील दानशूर व्यक्तिंकडून ग्रंथालयासाठी कपाट व ग्रंथ खरेदीसाठी जन सामान्यांच्या मनात वाचनाचे महत्व पटवून त्याच्या कडून निधी जमा करून विद्यार्थीनी साठी ग्रंथ संपदा जमा केली. आजच्या इंटरनेट आणी मोबाईल च्या काळात वाचन संस्कृती लोप होत असताना आपण विद्यार्थी व समाजासाठी केलेले निःस्वार्थी कार्य हे निश्चित पणे कौतुकास्पद आहे. प्रामाणिक पणे सेवा करणे ही सोपी गोष्ट नाही आणि आपले कौतुक करण्यासाठी याहून चांगली संधी नाही.डॉ. शिवाजी रामभाऊ राहणार निपाणी टाकळी ता. सेलू आपण आपल्या प्रशालेच्या ग्रंथालयाद्वारे विविध उपक्रम राबवून कोरोना काळात देश विदेशातील एकाशे आठ विद्यापीठाशी संलग्न होऊन वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न केले.आपण अतिशय नि: स्वार्थ पणे चांगले कार्य करून सेवा निवृत्त झालात.आपण केलेल्या कार्याचे कौतुक करावे तेव्हडे कमीच आहे. आज आपण खरोखरच कौतुकास्पद आहे. आपल्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. याची दखल घेऊन एम के फाउंडेशन दिल्ली व दैनिक विशाल क्रांती यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला आदर्श ग्रंथपाल जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा असे गौरविण्यात आले आहे.या पुरस्कार सोहळ्याचे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा ,आंध्र प्रदेश ,मध्य प्रदेश, दिल्ली येथील विविध क्षेत्रातील गुणवंतांना पुरस्कार देण्यात आले आहे.