८ एप्रिल रोजी मुकपदयात्रा काढुन बलिदान मासाचा समारोप
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम; धर्मवीर बलिदान मासास १० मार्च पासून प्रारंभ करण्यात आला होता. व ८ एप्रिल रोजी मुकपदयात्रेचे आयोजन करून समोरप करण्यात आला
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ संपूर्ण महाराष्ट्र तसेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही पाळला जाणाऱ्या धर्मवीर बलिदान मासला रविवार दि. १० मार्चपासून प्रारंभ करण्यात आला होता.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शेकडो धारकरी संपूर्ण महिनाभरापासून शहरपातळीवर दररोज सेलूतील शिवतीर्थ छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना श्रब्दांजली वाहण्यात आली
हिंदवी स्वराज्याचा शत्रू क्रुर कुर्कर्मी औरंगजेबाने छत्रपति श्री संभाजी महाराजांची ४० दिवस छळ करून अत्यंत निर्दयीपणे हत्या केली. तो संपूर्ण फाल्गुन महिना संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर बलिदान मास म्हणून उभ्या महाराष्ट्रात पाळला जातो.
१० मार्च रोजी सामूहिक मुंडण करून महिनाभर नित्य आदरांजली वाहत दि.८ एप्रिल रोजी सेलू शहरात या धर्मवीर बलीदान मास अर्थात महिन्या पासून सुतक पाळून धर्मवीर बलीदान मास मुकपदयात्रेचे आयोजन केले आहे त्याची सुरुवात बाबासाहेब महाराज मंदिर होऊन समारोप हा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका वर करण्यात आली
या मुकपदयात्रेचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सेलू विभागातर्फे केले होते
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे स्मरण हिंदू समाजाला रहावे या उद्देशाने हा उपक्रम होत असतो. या महिन्यात महाराष्ट्रातील विविध शहर जिल्ह्यांप्रमाणे सेलू शहरात
दररोज सायंकाळी छत्रपति श्री
संभाजी
महाराजांच्या प्रतिमेस श्रद्धांजली
वाहण्यात आली
संपूर्ण महिनाभर सुतक म्हणून मुंडण करणे, चप्पल परिधान न करणे, गोड पदार्थांचे सेवन न करणे, चहा वर्ज्य करणे, मांसाहार न करणे, कोणत्याही आनंदाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी न होणे, कोणत्याही आनंदोत्सवाचे आयोजन न करणे छत्रपती संभाजी महाराजांना महिनाभर श्रद्धांजली वाहणे
पध्दतीने धर्मवीर बलिदान मास धारकरी पाळत असतात. ज्यादिवशी छत्रपति संभाजी महाराजांची हत्या झाली, त्या फाल्गुन अमावस्येच्या दिवशी संपूर्ण हिंदू समाजातर्फे छत्रपति संभाजी महाराजांना मुकपदयात्रेद्वारे सामूहिक श्रब्दांजली वाहण्यात आली
फाल्गुन अमावस्या दी. ८ एप्रिल रोजी सायंकाळी ठीक ८:०० छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ श्रद्धांजली वाहण्यात आली