सेलू :-
मुस्लिम समाजाच्या न्याय मागण्यासाठि येथील सामाजिक कार्यकर्ते एडव्होकेट विष्णु ढोले यांनी दिनांक चार जुलै पासून डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक सेलू येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. आज 4 था दिवस आहे
सेलू येथील अलफ्लाह एज्यूकेशन अँड वेलफेअर सस्था सेलू च्या वतीने पाठींबा दिला या वेळी मौलाना तज्जुमल कास्मी,संस्थे चे अध्यक्ष अनिस कुरेशी कार्याध्यक्ष श्री हाजी शफिक अली खा सचिव महेमूद सर कोषध्यक्ष श्री निसार पठाण, उपाध्यक्ष श्री रशीद खान, शेख शमशोद्दीन श्री हारून सर जावेद घोरी, शेख असगर जकी सर यांनी पाठींबा दिला त्यांच्या मागण्या या प्रमाणे
१) मुस्लिम समाजाला सर्वच क्षेत्रांमध्ये 10 % आरक्षण देण्यात मावे
२) मुस्लिम समाजाला पुर्ण आरक्षण मिळेपर्यंत अंतरीम रित्या जुलै २०१४ मध्ये तत्कालीन आघाडी शासनाने अध्यादेशाद्वारे मुस्लिम समाजास दिलेले ५% आरक्षण जे शैक्षणिक क्षेत्रात माननिय उच्च न्यायालयाने मान्य केले होते ते आरक्षण पुर्नस्थापित करण्यात यावे
३) महाज्योती, सारथी, बार्टिच्या धर्तीवर मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी मार्टिची ( मौलाना आझाद रिसर्च & ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ) या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात यावी
४) मुस्लिम समाजाला आरक्षण मिळे पर्यंत या समाजातील विद्यार्थ्यांना उच्च व तंत्रशिक्षण 🌹 तसेच वैद्यकीय व इतर व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक फी मध्ये ५०% सवलत अर्थात शिष्यवृत्ती योजना सुरु करावी
५) मागासवर्गीय सहकारी संस्थांच्या धर्तीवर अल्पसंख्याक सहकारी संस्था स्थापन व नोंदणीसाठी कायदा करण्यात यावा
६) प्रत्येक तालूक्याच्या ठिकाणी उर्दु घर व मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक सभागृह उभारण्यात यावे
७) न्यायमुर्ती रंगनाथ मिश्रा आयोग, सच्चर समिती
महेमुद -ऊर्ररहेमान समीती या तिन्ही समितीने मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी