मानवत / प्रतिनिधी
मानवत पोलीस प्रशासन सदैव रोड रोमियोचा बंदोबस्त करण्यास तत्पर असून तुम्ही फक्त शालेय परिसरात सुरक्षा देण्यासाठी काही पाऊल उचला अशी माहिती मानवत पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी शहरातील सर्व शाळांच्या मुख्यध्यापक व शिक्षकांना घेण्यात आलेल्या बैठकीत दिली.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत शहरातील विविध शैक्षणिक संस्थेच्या विद्यालयातील मुख्याध्यापकांची महत्वाची बैठक दिनांक ५ जुलै रोजी मानवत पोलीस स्टेशन अंतर्गत शहरातील शाळांच्या प्रमुखाची पोलीस स्टेशन मध्ये महत्वाची बैठक घेण्यात आली. यावेळी मानवत पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यानी शालेय विध्यार्थी व विध्यर्थीनींच्या सुरक्षाबाबत आढावा घेण्यात आला.
तसेच शालेय विध्यार्थ्यांना डायल ११२ ची ईत्यंभूत माहिती द्या व आपत्कालीन परिस्थिती मध्ये डायल ११२ केल्यास पोलीस यंत्रणा तात्काळ मदतीला पोहचेल हि माहिती देण्यास सांगितले याच बरोबर प्रत्येक शाळा व महाविद्यालया मध्ये तक्रार पेटी बसवणे , पालकांची बैठक घेणे पोलीस पोलीस प्रशासन व शाळा महाविद्यालय प्रमुख यांच्यात समन्वय राहणे साठी व्हाट्सअप ग्रुप बनवून समन्वय साधने व महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीस ओळखपत्र बंधनकारक करणे अशी माहिती या वेळी देण्यात आली .
या वेळी मानवत पो. स्टेचे साहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड , पोलीस कर्मचारी विलास मोरे आदींची उपस्थिती होती या वेळी अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. या वेळी शहरातील के के.एम महाविद्यालयाचे रुपेश देशपाडे, शकुंतला कांचनराव कत्रूवार विद्यालयाचे पुंडलिकराव कजेवाड,सरस्वती बाई भाले पाटील विद्यालयाचे मूख्याध्यापक भारत मांडे, नेताजी सुभाष कनिष्ठ महाविद्यालयाचे एस. एम.नाईक आदींची या वेळी उपस्थिती होती.