माझी सैनिक संघटना आयोजित कारगिल विजय दिन
सेलू ÷ दि 26 जुलै शुक्रवार रोजी सायंकाळी 6:30 वाजता शहरातील क्रांती चौक परिसरातील क्रातीची मशाल जवळ
माझी सैनिक संघटना यांच्या वतीने आयोजित 26 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याने विजय मिळविला या संग्रामात शहीद झालेल्या सर्व जवानांना श्रद्धांजली अर्पण करून कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला.
तसेच कारगिल युद्धात सहभागी जवान भगवान भराटे, संजय जाधव तर माझी सैनिक तथा शेतकरी लक्ष्मण शेरे यांचे शहरातील सामाजिक कार्यकर्ते पुंजाराम निर्वळ हे दरमहिन्याला एक जवान व एक शेतकरी यांचे पाय धुऊन जवान व किसान यांच्या जिवणचरित्रावर अभिमान बाळगतात तसेच भारतीय जनता पक्ष शहराध्यक्ष शहराध्यक्ष अशोकराव अंभोरे ,रघुनाथ देशमुख, सामाजिक कार्यकर्ते मधुकर पौळ, सुनील गायकवाड यांनी कारगिल युद्धात सहभागी सैनिकांचे पुष्पहार घालून स्वागत केले.
जय जवान जय किसान म्हनत पाय धुऊन पुजण केले.
आणि जय जवान जय किसान भारत माता की जय घोषणा देत संपूर्ण परिसर कारगिल विजयी दिनानिमित्त फुलवू लागला.
या वेळी जे.पी.शर्मा,पोलीस निरीक्षक दिपक बोरसे, रमेशराव काकडे यांच्या हस्ते क्रांतीची मशाल पेटवून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी सखाराम महाजन, विठ्ठल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड,रामराव लाडाणे ,पुंजाराम निर्वळ, सदाशिवराव पौळ, पद्माकर वाकडीकर, प्रकाश देऊळगावकर,मधुकर पौळ, कैलास शेंडगे,आशोकराव अंभोरे ,रविंद्र मुळावेकर, संतोष जाधव,कपिल फुलारी,रघुनाथ देशमुख, संदिप बोकन अभय महाजन, सुरेश पवार, मारोती भिसे,सुरेश रोडगे,ज्ञानेश्वर कावळे, हरिभाऊ कुलथे, राजेश लोया,बंडु तिवारी, प्रकाश रोडगे, कैलास निर्वळ, गोरख राऊत विठ्ठल कटारे,विष्णुपंत शेरे,
प्रास्ताविक रमेशराव काकडे म्हणाले कि 25 वर्षा पूर्वी भारतीय सेनेला आजच्या दिवशी कारगिल युद्धात विजय प्राप्त झाला हे युद्ध 84 दिवस चालले सुत्रसंचलण सखाराम महाजन तर आभार सुनिल गायकवाड यांनी मानले आदि उपस्थित होते