नाल्या रोडची तोडफोड दुरुस्त करून देणे बाबत
उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
सेलू प्रतिनिधी
सेलू शहराच्या मधून राष्ट्रीय महामार्ग 548 बी झालेला असून त्या कामांमध्ये सर्वोदय नगर येथील गल्लीमधील नाल्यांची रोडची झालेली तोड फोड अजून दुरुस्त केलेली नाही त्यामुळे सर्व नागरिकांना येण्या जाण्यास त्रास होत आहे जेणेकरून सदरील परिसरा मधील वापर केलेले सांडपाणी पाणी बाहेर जात नाही व फोडलेल्या रस्त्यामुळे लोकांना बाहेर निघतात येत नाही व त्या परिसरा मध्ये
नगरपालिकेची कचरा गाडी लोकल ऑटो रिक्षा भाजीपाल्या वाले यांना गल्लीमध्ये येता येत नाही या एरियामध्ये अतीअवश्यक सेवा बंद होत आहेत. तरी त्रस्त असलेल्या नागरिकांची विनंती आहे की प्रशासनाने लवकरात लवकर नाल्यांची रोडची दुरुस्ती करण्यात यावी व महामार्ग वरील लाईटचे खांब बंद असलेले चालू करण्यात यावे व वृक्ष लागवड ही करण्यात यावे अन्यथा येथील रहिवाशी लोकशाही पद्धतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल व पुढील परिणामास प्रशासक जिम्मेदार असेल. हे निवेदन देताना
आकाश खनपटे,प्रशांत भदर्गे,निखिल टाक,अनिल सरकटे,महादेव पानझडे,कपिल वाघमारे,सतीश मोरे,प्रतीक खरात,सुयोग साळवे सुमेध अंभोरे .विकास धापसे .प्रवीण गायकवाड. कैलास सुलाने. दीपक बछ्चिरे.सुबोध काकडे. मनीष कदम .राहुल दिगंबर धापसे. विक्रम मस्के .विनोद धापसे .वैभव श्रीपाद . वैजनाथ पैठणे. मुकेश घोडे आदी उपस्थित होते