सेलू | रोहित झोल
सेलू तालुक्यातील मौ. काजळी रोहीणा येथील मेन लाईन चे विद्युत पोल पडलेले असून गावातील लाईट तिन दिवसापासून बंद आहे. त्यामुळे गावातील दैनंदिन व्यवस्था पुर्ण पणे बंद पडलेली असून गावामध्ये पाणी तसेच पिठाची गिरणी बंद आहे त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. सद्यस्थीती मध्ये पिकाची मशागत करण्यासाठी गावातील महिला व पुरुष शेतात जात आहेत. व गावामध्ये आल्यावर विद्युत लाईट नसल्यामुळे घरगुती सगळे कामांना अडचण येत आहे. त्यामुळे आपण आपल्या स्तरावरुन योग्य तो निर्णय घेवून खंडीत झालेला विद्युत पुरवठा चालू करुन देण्यात यावा जेणे करुन नागरिकांची गैरसोय होणार नाही. सदरील गावामध्ये विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे वेळोवेळी आपणाकडे अर्ज करावा लागतो. सद्यपरिस्थीती पावसाळा असल्यामुळे मच्छर, माशी याचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भिती निर्माण झालेली आहे.
तरी मे. साहेबांनी संबंधीत कर्मचाऱ्यांना आदेशीत करुन लवकरात लवकर विद्युत पोल ची दुरुस्ती करुन गावातील खंडीत झालेली लाईट पुर्ववत करुन देण्यात यावी मा उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ व उपविभाग सेलू यांना निवेदन देता वेळेस गावकरी भारती जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस परभणी विजय काष्टे कल्याण काष्टे अजित बापूराव काष्टे गणेश काष्टी वसंत काष्टे राजेश महादेव तातेराव काष्टे खिस्ते ज्ञानेश्वर काष्टी विठ्ठल काष्टे आसाराम काष्टे.