-सेलू येथे परभणी जिल्हास्तरीय निवड चाचणी व योगासन स्पर्धा.
सेलू (प्रतिनिधी):
अनेक वेळा मुलांना एखादा धडा पाठांतर केल्यानंतरही लक्षात राहीत नाही. मुलांच्या अभ्यासाची चिंता वाटत असेल तर मुलांची एकाग्रता आणि फोकस वाढवण्यासाठी त्यांनी योगासनं करायलाच हवेत, असे प्रतिपादन सेलू शहरातील सामाजिक कार्यकर्ते अशोक अंभोरे यांनी केले. शनिवार, दि.२७ जुलै रोजी परभणी जिल्हा योगासन असोसिएशन, बृहन महाराष्ट्र योगा परिषद यांच्या वतीने परभणी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेच्या निवड चाचणी निमित्ताने ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. एस. व्ही. पाटील तर प्रमुख उपस्थितत डॉ. शैलेश मालानी, युवा नेते संदीप बोकन, उपमुख्याध्यापक के. के. देशपांडे, प्रा.नागेश कान्हेकर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना त्वचारोग तज्ञ डॉ. शैलेश मालाणी म्हणाले की, पालक मुलाच्या अभ्यासाची चिंता वाटत असेल, मुलांनी एखादा धडा बऱ्याच वेळा पाठांतर करूनही त्यांना लक्षात राहत नसेल तर मुलांची एकाग्रता आणि फोकस वाढवण्यासाठी त्यांच्या रुटीनमध्ये या योगासनांचा समावेश करा. योग मुलांना तणाव नियंत्रित करण्यास आणि त्यांची एकाग्रता, लक्ष केंद्रित करण्यास आणि स्मरणशक्ती वाढविण्यात मदत करू शकतो.
अध्यक्षिय समारोप करताना मुख्याध्यापक एस.व्ही. पाटील म्हणाले की, शालेय जीवनातच योगासनाची गोडी निर्माण झाली तर विद्यार्थ्यांना त्यांच्या मानसिक शारीरिक तंदूरची सोबत अभ्यासातही या खेळाचा त्यांना खूप चांगला उपयोग होईल पुढे यातून आपण राज्यस्तरीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून नावारूपास याल अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी स्पर्धेसाठी उपस्थित असलेले पंच माधव देशपांडे, शिल्पा पिंपळे, कृष्णा होलिया, सोमनाथ महाजन, सुष्मा सोमाणी, सुष्मिता भरदम , बाळू बुधवंत परीश्रम घेत आहेत.
उपस्थित योग मार्गदर्शक खेळाडू प्रशांत घिके , नानाभाऊ काटे, पंडित दाभाडे, संगीता दाभाडे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी कु. काव्या राजवाडकर, कु.यशिका खराटे, कु.सृष्टी सोळंके, श्रुती खंदारे यांनी योगासनाचे चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर केली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा संयोजक पर्यवेक्षक डी.डी. सोन्नेकर (जिल्हा सचिव, योगासन स्पोर्ट्स असोसिएशन) यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे तर आभार प्रदर्शन प्रा.नागेश कान्हेकर यांनी केले.