प्रतिनिधी सतिश आकात
विद्यमान वन विभाग व सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आर्य वैश्य महासभा शाखा सेलू च्या वतीने आज हातनूर ता.सेलू येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला ..
निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे.. या वाढदिवसाच्या अवचित्य साधून आर्य वैश्य महासभा शाखा सेलू च्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वृक्षमित्र श्री अभिजीत राजुरकर मोरया प्रतिष्ठान अध्यक्ष सेलू ,आर्य वैश्य महासभा परभणी उपजिल्हाध्यक्ष माधव अण्णा लोकलवार,श्री बाळासाहेब आंधळे नागनाथ मंदिर संस्था अध्यक्ष,श्री बालाजी काचेवार माजी नगरसेवक,श्री सुधाकर रोकडे राष्ट्रवादी पक्ष तालुकाध्यक्ष,श्री भगवान आंधळे,श्री विकास गादेवार,श्री महेंद्र गाडे सरपंच हातनुर,श्री मोहन कोत्तावार,श्री जयसिंग शेळके माजी सरपंच हातनुर,श्री मोटरवार श्री नागनाथ कालकुटे, श्री शिवाजीराव आंधळे,श्री राठोड संजय सर मा.मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा हातनुर ,सुजित मिटकरी,सदाशिव बर्वे ,योगेश कोटलवार,प्रवीण कोत्तावार,साई गादेवार आर्य वैश्य समाज युवक तालुका अध्यक्ष गणेश काचेवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती त्याचबरोबर आर्य वेश्य समाज सेलू तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित पुरुषवर्ग व महिलावर्ग व ग्रामस्थ हे उपस्थित होते हातनुर परिसरातील महादेव मंदिराच्या परिसरात काही झाडे आणि जिल्हा परिषद शाळा हातनुर येथे काही झाडे लावण्यात आली असे एकूण 100 विविध झाडांचे वृक्षारोपण आज करण्यात आले.