सेलू / प्रतिनिधी
शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात ( दि.१ऑगस्ट ) रोजी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
इयत्ता १ ले ते ५ वी विभागात ५ वी च्या विद्यार्थ्यांची बालसभा आयोजित करण्यात आली होती. तसेच ६ वी ते ८ वी विभागात इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांची बालसभा आयोजित करून भाषणाचा कार्यक्रम घेण्यात आला.विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या चरित्र व कार्यावर भाषणाच्या माध्यमातून प्रकाश टाकला.कार्यक्रम यशस्वीते साठी शिक्षकांनी प्रयत्न केले.