सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे राहणाऱ्या तुकाराम दत्ताराम नाटकर या युवकाने सेलू येथील उप जिल्हाधिकारी कार्यालयात आज गावातील मूलभूत गरजा मागील काही वर्षापासून बंद असल्यामुळे सेलू येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे. मु.पो.मोरेगाव तालुका सेलू जिल्हा परभणी येथील गावामध्ये महिलांसाठी मंदिराजवळ शौचालय बांधले होते, परंतु त्याचे सर्व बांधकाम होऊन पैसे उचलून घेऊनही आज रोजी अडीच वर्षे होत आहेत ते बंद आहे. गावामध्ये आरोग्य केंद्र आहे, त्याचा लाभ मोरेगाव शेजारील अनेक खेडे गाव व मोरगाव यांना होत असून ते सुद्धा अडीच ते तीन वर्षापासून बंद आहे. भर पावसाळ्यात गावात सांडपाण्यासाठी वापरायचे पाणी सोडत नाही. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेले आहे असे अनेक प्रश्न गावात आहेत. गावाचे सरपंच फोन उचलत नाही आणि भेटत नाही तसेच गावाचे ग्रामसेवक फोन बंद करून ठेवतात. असे तुकाराम नाटकर यांनी त्यांच्या निवेदनात दिले व वरील प्रश्न मार्गी लावावे असे त्या निवेदन मध्ये सांगितले.