विकासाच्या नावाखाली जनतेची लूट..कंत्राटदार मात्र खुश…!..

प्रतिनिधि सतिश आकात

एकीकडे विकसित महाराष्ट्र प्रबळ,महाराष्ट्र करण्यासाठी सरकार जोराने काम करत आहे. प्रत्येक शहराला कोट्यावधी रुपयांमध्ये निधी प्राप्त करून देत आहे. छोट्या छोट्या कामाकडे लक्ष देत आहे, परंतु ह्याचाच फायदा घेत काही कंत्राटदार मात्र स्वतःचे खिसे भरत आहेत आणि जनतेसाठी आलेल्या पैशाची लुटा लूट करत आहेत. असाच एक प्रकार सेलू येथे घडला आहे..

प्रभाग क्रमांक 10 आत्रे नगर सेलू येथील हनुमान मंदिरासाठी आलेला निधी अनेक वर्षापासून मंदिराच्या खुल्या असलेल्या मैदानासाठी तार कुंपण करण्याचा निधी मंजूर झाला. लाखो रुपयांचा निधी येऊनही पहावे तसे पूर्ण तिचा उपयोग झाला असे काही दिसत नाही. चारी बाजूने तार कुंपण करण्यासाठी आलेला निधी मात्र चारी बाजूने कुंपण उघडेच असाच रित्या तार कुंपणाचे चे काम पूर्ण केल्या गेले आहे. मंदिरासाठी आलेल्या निधी चा एवढा भ्रष्टाचार खुलेआम होत आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये पसरत आहे अशा खुलेआम भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदाराची 100% मधला किती निधी कामासाठी लावला अशी सखोल चौकशी करणार कोणी वाली उरलाच नाही असे दिसून येत आहे..

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button