सेलू | प्रतिनिधी
सेलू शहरामध्ये गेल्या एक महिन्यापासून सतत पाऊस पडत असून नविन वसाहतीमध्ये जागोजागी पाणी साचले आहे. त्यामध्ये डासांची उत्पत्ती होत असून डासांचा खुप त्रास होत आहे त्याचबरोबर शहरामध्ये ठिक ठिकाणी घाण पाणी जमा झालेले असून शहरातील अस्वच्छता वाढली आहे या कारणामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे डेंग्यु, मलेरीया सदृश्य आजार वाढलेले आहेत.
तरी मे. साहेबांना विनंती की, न.प. प्रशासनाने ताबडतोब डास निर्मुलनासाठी फवारणी करावी जेणे करुन नागरीकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही . माजी नगराध्यक्ष मारुती रामचंद्र चव्हाण यांच्यावतीने मा. मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद सेलू यांच्याकडे निवेदन देण्यात आले