नूतन विद्यालय केंद्रावर चित्रकला स्पर्धेस उस्पुर्त प्रतिसाद..
सेलू ( प्रतिनिधी ) चित्रकला स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन सेलूचे तहसीलदार शिवाजी मगर यांनी व स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. नूतन विद्यालय केंद्रावर महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ,आणि शिक्षण विभाग (माध्य.) जिल्हा परिषद, परभणी यांच्या मार्फत राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धा १३ ऑगस्ट २०२४ मंगळवार संपन्न झाल्या.
या वेळी प्रमुख उपस्थिती सेलू चे तहसीलदार मा शिवाजी मगर, उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, चित्रकला विभाग प्रमुख आर डी कटारे यांची उपस्थिती होती.
चित्रकला स्पर्धेसाठी जवळपास चारशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चित्रकला विभाग प्रमुख आर डी कटारे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिनाथ पल्लेवार यांनी केले तर आभार फुलसिंग गावित यांनी मानले स्पर्धा यशस्वीतेसाठी संतोष मलसटवाड, सच्चिदानंद डाखोरे, अरविंद आंबेकर, विरेश कडगे,शिल्पा बरडे, शैलेजा कउतकर, दायमा मॅडम, अर्चना कुळकर्णी, चव्हाण, केशव डहाळे आदींनी परिश्रम घेतले.