सेलू / प्रतिनिधी
येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्याचा ७८ वा स्वातंत्र्य उत्सव साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी होते .तसेच स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर ,शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी ,मुख्याध्यापक शंकर शितोळे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी ध्वजारोहन करण्यात आले.भारतमाता ,अहिल्याबाई होळकर ,महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीची माहिती भाषणातून सादर केली.उच्च प्राथमिक विभागाच्या मुलींनी लेझीम प्रात्यक्षिक सादर केले.या विद्यार्थीनींना दीपाली पवार ,सोनाली जोशी व विजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.प्राथमिक विभागाच्या प्रगती वर्गाच्या महिनावार चाचणी परीक्षेचे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना बक्षिस म्हणून टोपी व पेन देण्यात आले.अध्यक्षीय समारोपात हरिभाऊ चौधरी यांनी स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला. क्रांतिकारक यांच्या बलिदानाची माहिती दिली.शंकर राऊत व अनिल कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी सामना घेण्यात आला.विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद मंडलिक यांनी केले.