देऊळगाव गात वार्ताहर निळकंठ पवार
देऊळगाव गात येथे दिनांक 16 ऑगस्ट रोजी मध्येरात्री साधारण 2 ते 4 च्या दरम्यान देऊळगाव गात येथे विविध तीन ठिकाणी चोरीचा प्रकार घडला, विशेष म्हणजे यात एक किराणा दुकान व तीन घरांना बाहेरून कुलूप लावलेले होते, त्यात चंद्रकांत ज्ञानेश्वर कदम हे कार्यक्रमांसाठी बाहेरगावी गेले होते त्यांच्या घरातील कपाटातील तोडून 25 रु हजार रोख व 5 हजार रु चे काही दागिने चोरट्यांनी लंपास केले.
जगन जाधव यांचे किराणाचे दुकानाचे कुलपाचा कोंडा तोडून पाच हजार रुपये रोख व सामान असे सहा हजार रुपये चोरले. शेजारी पांडुरंग माने यांचे कुलूप तोडून काही सापडते का शोधले व सूर्यकांत बन्सीधर गोरे हे बाहेरगावी असल्याचे पाहून त्यांचे कुलूप तोडून आतील ग्रह उपयोगी सामान अस्ताव्यस्त केले. तर या चोरीच्या घटनेची फिर्याद शंकर कदम यांनी सेलू पोलीस स्टेशनला दिल्यामुळे अज्ञात चोरटे विरुद्ध सेलू पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पाटील देऊळगाव गात त्यांना माहिती मिळतात त्यांनीही पोलिसांना कळवले. घटनास्थळी सेलु पो. स्टे.चे पोलीस निरीक्षक श्री दीपक बोरसे यांनी भेटी घेऊन पहानी केली, तर तपासकामी यावेळी चोरट्यांच्या माघ काढण्यासाठी श्वान पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्ट ची टीम ही बोलवण्यात आली होती. यावेळी पोलीस पाटील मारुती साखरे उपस्थित होते सदर चोरीचा पंचनामा करून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार श्री ज्ञानेश्वर जाणगर व मनोहर कोपनर हे करीत आहेत