विठ्ठल बाबासाहेब लीखे यांना विशेष सेवा पदक..
प्रतिनिधी सतिष आकात
सेलू तालूका मारेगाव येथील रहिवाशी विठ्ठल बाबासाहेब लीखे यांनी नक्षलग्रस्त भागात विशेष कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पोलीस महासंचालक यांचे कार्यालयाकडून त्यांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यांनी गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर गट क्र. ०७ दौंड कारवायांना परिणामकारक आळा घालण्याकरिता विशेष प्रयत्न केले. राज्य राखीव पोलीस दल मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या या कामगिरीचे संपूर्ण सेलू कौतुक तसेच अभिनंदन होत आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्यात विशेष सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी, जवानांना विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले. या नक्षलग्रस्त भागात राज्यातील पोलीस तसेच राज्य राखीव दलाचे जवान यांची नियुक्ती करण्यात आली होती. या मध्ये परभणी जिल्ह्यातील विठ्ठल लीखे यांनी केलेल्या कामगिरीमुळे सेलू तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.