प्रतिनिधी सतिश आकात
महाराष्ट्रामध्ये बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये अत्यंत निंदनीय मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे, तीन ते चार वर्ष वयोगटाच्या चिमुकलीवर त्याच शाळेत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यांने अत्याचार केला , आणि त्या पीडित मुलीच्या आई-वडिलांनी जेव्हा संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना 12 ते 13 तास बसून ठेवलं यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या विरोधात रोष तयार झाला आणि नागरिकांनी तीव्र आंदोलन केले त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले आहे, तर सरकार वेगवेगळे इव्हेंट निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रचार करण्यात मग्न आहे.
आमच्या माय बहिणींना तुमची तुटपुंजी मदत नको पाहिजे ती सुरक्षा अशा शब्दात सरकारला प्रत्युत्तर देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणी जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन आज बुधवार 21 ऑगस्ट रोजी दुपारी 1 30 वाजेच्या सुमारास परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारविरोधात निषेध मोर्चा काढून जोरदार आंदोलन करत परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल यांना निवेदन देऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली , बदलापूर येथे घटनेचा निषेध करणाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख विशाल कदम , डॉक्टर विवेक नावंदर , संजय साडेगावकर , पंढरीनाथ घुले ,गंगाप्रसाद आनेराव ,अनिल जाधव, अंबिका डहाळे, सुरेखा टाले, शोभा ईकर , गीता पुरी, आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.