प्रतिनिधी सतिष आकात
येथील जवाहर रोड वरील एस बी आय बँकेत पीक कर्जाची रक्कम भरण्यासाठी गेलेल्या एका निवृत्त कर्मचाऱ्याची पिशवीतील दीड लाख रुपये अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याची घटना आज दि २९/८/२४ गुरुवार रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली .
सदरील फिर्यादीवरून दोन अज्ञात महिलांच्या विरोधात सेलू पोलिसात कलम ३०३(२),३(५)च्या भारतीय दंड संहिता नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शेख करीत आहेत
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथरी गोदावरी दुधना साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत सखारामपंत पिंपळगावकर यांनी महाराष्ट्र बँक पाथरी येथून दोन लाख रुपये काढले होते .व त्यातील चाळीस हजार दुसऱ्या पिशवीत गाडीच्या डिक्कीत ठेवले ठेऊन एक लाख साठ हजार रुपये फिकट पिवळ्या रंगाच्या पिशवीत बँकेत भरण्यासाठी गेले .बँकेत काउंटरवर स्लिप भरीत असतांना त्यांच्या बाजूला एक तोंडाला बांधलेली व दुसरी हिरव्या साडीवाली डोक्यावर पदर घेतलेली अशा दोन महिला होत्या .त्यांनी काउंटर वर भरलेली स्लिप देऊन पैसे काढण्यासाठी पिशवीत हात घातला असता त्यात फक्त १०,०००/- रुपयेच होते व पिशवी डाव्या बाजूला फाटलेली दिसून आली .
त्यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात महिलांच्या विरोधात दुपारी साडेचार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे .