सेलू
तालूक्यातील सेलू-परभणी रेल्वे ट्रॅक वरील सेलू रेल्वे स्थानकापासून दोन किमी अंतरावर असलेल्या सेलू वरून धनेगावकडे जाणारया अंडरग्राउंड रस्त्यासाठी आमदार मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांना फोन करून रस्ता तयार करून शेतकरी व धनेगाव ग्रामस्थांची अडचण दूर करण्यासाठी साकडे घातले.
गुरूवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील धनेगाव व सेलू तील शेतकरयांनी आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांची भेट घेतली व तसेच दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या या अंडरग्राउंड रस्त्याअभावी शेतकरी व ग्रामस्थांचे होणारे हाल याचा पाढा वाचला आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी तात्काळ दखल घेऊन केद्रीय रेल्वे मंत्र्याना फोन करून शेतकरयांच्या व्यथा मांडल्या, तसेच दमरे नांदेड चे डी.आर.एम. यांच्या शी संपर्क करून तातडीने संबंधित अंडरग्राउंड रस्ता तयार करण्यबाबत सुचना दिल्या.
या वेळी धनेगाव चे उपसरपंच श्याम कटारे, शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार नावाडे, अनुप गुप्ता, गणेश गोरे, विशाल लोया, सुरेश खेत्रे, श्रीधर खेत्रे, व्यंकटेश काबरा, सुर्यकांत जाधव,जकी पठाण, बाळू खेत्रे, हारून बागवान, श्रीहरी कटारे, बबन भोसले, सुखानाना कटारे, रमेश खेत्रे, जब्बारभाई ,रंगनाथ काळे विशाल गोरे आदी धनेगावचे ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.