सेलू तालुक्यातील हिस्सी येथील शेतमजूर शेतकऱ्याचा आपल्या शेतातील सात एकर वरील कापूस उध्वस्त झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. याबद्दल सविस्तर माहिती अशी की सेलू तालुक्यातील हिस्सी येथील शेतमजूर शेतकरी विजय कचरूबा कसाब या तरुण शेतकऱ्यांनी दुसऱ्याचे सात एकर शेत भाड्याने शेती करण्यासाठी घेतले होते स्वतः शेतमजूर भूमी येण असून दुसऱ्याची जमीन ठोक्याने केली होती त्यामध्ये सात एकर वर पूर्ण कापूस पिकाचे उत्पादन घेतले होते कापूस एक चांगल्या पद्धतीने आलेली होते पण हे अतिवृष्टी पावसाने होत्याची नव्हती झाली 7 एकर वरील संपूर्ण पीक उध्वस्त झाल्याने विजय अस्वस्थ झाला व घरी येऊन चिंता करू लागला तो आपल्या पत्नीला मनाला आपण केलेली ठोक्याची जमीन वरील कापसाचे पीक आपल्या हातून गेले आता आपल्या हाती काहीच लागणार नाही या चिंतेने त्याच्या हृदयाची ठोके वाढायला लागली छातीमध्ये कळा येऊ लागल्याने तो खाजगी रुग्णालयामध्ये गेला रुग्णालयामध्ये दाखल होताच त्याचा जीव गेला असे डॉक्टरांनी मृत घोषित केले विजय हा घरचा करता माणूस असल्यामुळे त्याच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला त्याचे वय 38 वर्षे होते त्यांच्या पश्चात आई पत्नी तीन मुली एक मुलगा व भाऊ असा त्याचा परिवार आहे