(प्रतिनिधि सतिश आकात)
आज दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी सेलू येथील मोरेगाव ते डिग्रस शिवारातील हॉटेल सम्राट च्या समोर दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास कुबोटा कंपनीचे MU4501 ट्रॅक्टर मध्ये चालक गणेश प्रल्हाद निर्वळ वय वर्ष 25 व्यवसाय चालक राहणार दिग्रस वाडी हा सेलू मोरेगाव रोडवर मोरगाव शिवारातील दुधना नदी पात्राच्या पुलाखालून सदर ट्रॅक्टर मध्ये अवैध्य विनापरवाना रेती भरून शासनाची कोणतीही परवानगी न घेता शासनाचा महसूल बुडवण्याच्या उद्देशाने अवैधरीत्या चोरटी वाळू विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना मोरगाव ते सेलू रोडवर दिग्रस शिवारातील हॉटेल सम्राट च्या समोर सार्वजनिक रोडवर मिळून आला आहे म्हणून सदरील चालकावर सेलू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे साहेब यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांच्याकडे देण्यात आला आहे.